जोगीसाखरा येथील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेला महाराष्ट्र शासन “आदिवासी सेवा संस्था” राज्य पुरस्कार जाहीर

आरमोरी-महाराष्ट्र राज्यात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना व सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या / त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत व्यक्ती व संस्था यांना अनुक्रमे “आदिवासी सेवक पुरस्कार व आदिवासी सेवा संस्था पुरस्कार” हा राज्य पुरस्कार दरवर्षी प्रदान करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेला आदिवासींच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन २०२१-२२ चा”आदिवासी सेवा संस्था पुरस्कार” हा राज्य पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे कार्यासन अधिकारी सतीश कोवे यांनी आदिवासी विकास विभाग शासननिर्णय क्र. आ.से.पु.-२०२०/प्र.क्र.२७ /का-१४मंत्रालय मुंबई दि.२३ नोव्हेंबर २०२३ नुसार जाहीर केला आहे.
“आदिवासी सेवक पुरस्कार” प्राप्त व्यक्तीस रु. २५,००१/- तसेच “आदिवासी सेवा संस्था पुरस्कार” प्राप्त संस्थेस रु ५०,००१/- एवढी रक्कम पुरस्कार म्हणून देण्यात येते. सन २०१९-२०, सन २०२०-२०२१, सन २०२१-२२ व सन
२०२२-२३ या वर्षातील पुरस्कार हा कोरोना परिस्थिती व काही अपरिहार्य कारणामुळे देण्यात आलेला नव्हता. येथील अनु क्र.४ मधील शासन निर्णयानुसार गठीत केलेल्या आदिवासी सेवक/संस्था पुरस्कार राज्यस्तरीय निवड समितीची बैठक दि.०७/११/२०२३ रोजी पार पडली. सदर समितीने शिफारस केल्यानुसार अनु.क्र.६ अनुसार प्रस्ताव राज्यस्तरीय निवड समितीचे सदस्य सचिव व आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचेकडून शासनास प्राप्त झाला. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने सन २०१९-२०, सन २०२०- २०२१, सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या चार वर्षातील एकत्रित आदिवासी सेवक/आदिवासी सेवा संस्था पुरस्कार देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.सन २०१९-२०, सन २०२०-२०२१, सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या चार वर्षातील एकत्रित “आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था पुरस्कार” देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. सन २०१९-२० ते सन २०२२-२३ या चार वर्षांतील पुरस्कारासाठी एकूण ६० व्यक्तींची “आदिवासी सेवक पुरस्कार” देण्यासाठी तसेच सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या वर्षासाठी ८ संस्थांची “आदिवासी सेवा संस्था पुरस्कार” देण्यासाठी निवड केली आहे. या शासन निर्णयाव्दारे गडचिरोली जिल्यातील आरमोरी तालुक्यातील एकमात्र जोगीसाखरा येथील आदिवासिंच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेची आदिवासी सेवा संस्था पुरस्कार देण्यासाठी निवड झाली आहे.श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखराचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी सण२०२१-२२ मध्ये संस्थेला पुरस्कार मिळावा यासाठी आदिवासी विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यांच्या संस्थेच्या प्रस्तावाची व कार्याची शासनाने दखल घेऊन श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखराला “आदिवासी सेवा संस्था पुरस्कार” जाहिर केला. यात श्रीगुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखराचे अध्यक्ष दिलिप घोडाम, उपाध्यक्ष शेषराव कुमरे, सचिव गिरिधर नेवारे ,संचालक सुरेश मेश्राम यादवराव कहालकर, धर्मा दिघोरे, गोपाल खरकाटे, शेषराव काटेगे, धर्मराज मरापा, दामोदर मानकर, उज्वला मडावी, गोपिकाबाई कोल्हे यांचे श्रेय मोलाचे ठरले आहे.
श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेला या कार्यासाठी जाहीर झाला पुरस्कार
या जंगल कामगार संस्थेच्या वतीने सभासदांना सर्वात जास्त कामे मिळाली. श्रमदानातून- ग्रामस्वछता, आरमोरी तालुक्यातील विविध गावी धार्मिक व शासकीय राजस्व अभियान कार्यक्रमात पाणपोईची सोय करून लाभार्थ्यांची तहान भागविली, जंगलात आग लागली तर ती आग विझविण्यासाठी मदत केली,संस्थेमार्फत सभासदांना मागदर्शन शिबिर, विविध आदिवासी क्रांतिकारकांच्या जयंती साजरी केली,रक्तदान शिबीर घेऊन गरजूंना रक्तदान केले, पुर ग्रस्तांना मदत , भामरागड तालुक्यातील बिनागुंडा गावात जाऊन आदिवासीच्या समस्या जाणून शासनाकडे पाठपुरावा केला, संस्थेच्या सभासदांच्या सुनेला डिलवरी साठी मदत, वनडेपोतील मृतक मजुरांच्या कुटुंबालाआर्थिक मदत, सभासदांच्या अंत्यविधीसाठी मदत ,संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी मागदर्शन शिबिर, जकास च्या मदतीने विध्यार्थ्यीनीवर शस्त्रक्रिया, शासन आपल्या दारी कार्यक्रमात तालुका संस्थेच्या पाणपोई. ध्दारे भागविली तहान, बिरसा मुंडा जयंती निमित्त संस्थेच्या वतीने सर्वधर्मिय विवाह सोहळा, तहसील कार्यालयाच्या वतीने जकास संस्था सन्मानित, अनेक वेळा रक्तदान शिबीर घेऊन गरज वताना रक्ताची मदत, वनसंरक्षक डॉ किशोर मानकर व उपवनसंरक्षक सालविठ्ठल यांच्या कडुन संस्थेच्या कामाची प्रशंसा, जकासच्या माध्यमातून धान -मका खरेदी साठी प्रयत्न, खो -खो व्हालिबाल स्पर्धेत व . आदिवासी जनजागरण कार्यक्रमात सहभागी,रानटी हत्ती व नरभक्षक वाघ हाकलण्यास सहकार्य, विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, कुपकामावर जाऊन कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला.