आरमोरी पॅटर्न’ने हितकारिणी विद्यालय आरमोरी येथील विद्यार्थ्यांना मिळाले 59 जातीचे दाखले

 

प्रशासकीय अधिकारी ओमकार पवार यांचा स्तुत्य उपक्रमाला यश

 

आरमोरी :-

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ओमकार पवार(आय. ए. एस.)हे आरमोरी येथे रुजू होताच विद्यार्थ्यांना एका दिवसात जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक शाळेतून कागदपत्रे जमा करून प्रत्येक विद्यालयातील मुख्याध्यापक यांच्या वतीने जातेचे दाखल्या संबंधी कागदपत्रे जमा करून तहसील कार्यालय आरमोरी येथे जमा केले.

हितकारिणी विद्यालयातील वर्ग 5 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना माहिती देऊन ज्या विद्यार्थ्यांकडे जातीचे दाखले नाहीत अश्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांची कागदपत्रे जमा करण्यात आली त्याच्या पुरावानुसार विद्यार्थ्यांनी जमा करून 70 विद्यार्थ्यांपैकी 59 विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळाले आहेत.

विद्यालयात विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून जातीचे प्रमाणपत्र सु्फूर्थ करण्यात आले त्या त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक जयदास फुलझेले यांनी उपविभागीय अधिकारी पवार यांचे आभार मानले आहे.

दाखले वाटप करतांना संचालन पर्यवेक्षक बहेकार यांनी केले व आभार बुद्धे यांनी केले.