मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा तालुक्यातून तिसऱ्या क्रमांक प्राप्त
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मध्ये श्री किसनराव खोबरागड एज्युकेशन सोसायटी आरमोरी द्वारा संचालित श्री किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय तालुक्यातून तृतीय क्रमांक मिळवण्यात यश प्राप्त केलेले आहे. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या औचित्य साधून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मध्ये प्राप्त आमच्या विद्यालयाला मानचिन्ह व मान पत्र देऊन गौरविण्यात आले. मनाचे मानकरी श्री भाग्यवानजी खोब्रागडे तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विवेक हलमारे यांच्या हस्ते सदर मानचिन्ह व मानपत्र स्वीकारण्यात आले . सदर कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी केंद्रीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यांनी निकषात पात्र ठरल्याबद्दल व तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री मा.भाग्यवानजी किसनराव खोब्रागडे व संस्था सचिव डॉ सचिन भाग्यवानजी खोब्रागडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक तथा सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक करून अभिनंदन केले .