यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोरची : आरमोरी विधानसभा काँग्रेस पक्षाच्या वतीने च्या वतीने गुरुवार पासून जनसंवाद परिवर्तन यात्रेची सुरुवात कोरची तालुक्यातून करण्यात आली. या यात्रेची सुरुवात तालुक्यातील श्रध्दास्थान असलेल्या ढोलीगोटा येथून विधिवत पणे पूजा अर्चना करून करण्यात आली. काँग्रेस पक्ष कोरची चे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल यांच्या नेतृत्वात ही जनसंवाद परिवर्तन यात्रा कोरची तालुक्यात आयोजित करण्यात आली असून येत्या रविवार पर्यंत ही जनसंवाद परिवर्तन यात्रा कोरची तालुक्यात सुरु राहणार आहे.
शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बेरोजगार, युवक, महिला, व्यापारी, विद्यार्थी, विद्यार्थीनींचे व अशा अनेक घटकांच्या समस्येच्या विरोधात संपूर्ण आरमोरी विधानसभा क्षेत्रात जनसंवाद परिवर्तन यात्रा ही सुरु राहणार असून गुरुवारी कोरची येथील आठवडी बाजारात ही जनसंवाद परिवर्तन यात्रा काढून जनतेशी संवाद करून त्यांची समस्या जाणून नागरिकांशी चर्चा करण्यात आली यावेळी शहरात छोटे कॉर्नर सभा घेण्यात आली. यानंतर संध्याकाळी टेमली या गावात भेट देऊन नागरिकांशी संवाद करण्यात आला.
यावेळी काँग्रेस नेते रामदास मसराम, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष सौ. प्रेमिला काटेंगे, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सदरुद्दीन भामानी, काँग्रेस जिल्हा महासचिव हकीमुद्दीन शेख, नगरपंचायत कोरची नगराध्यक्ष सौ. हर्षलता भैसारे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, कुरखेडा काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष जीवन नाट, पंचायत समिती वडसा माजी सभापती परसराम टिकले, माजी पंचायत समिती सभापती सौ. कचरीताई काटेंगे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष धनीराम हिडामी, अनुसूचित जाती सेल तालुका अध्यक्ष आनंदराव मेश्राम, रामदास साखरे, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, नगरसेवक दिलीप मडावी, उद्धव कोरेटी,नगरसेवक धरमसाय नैताम, नगरसेवक धनराज मडावी, नगरसेविका कौशल्या केवास, नगरसेविका निरा बघवा, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष दीपक हलामी,तुलाराम मडावी, रुख्मण घाटघुमर, आसाराम संडील, बुधराम फुलकुवर,जीवन नुरुटी, विठ्ठल शेंडे, व्यंकट वालदे,चतुर सिंद्राम,गोपाल मोहुर्ले, जावेद शेख, कमलेश बारस्कर, परशुराम ठाकरे, प्रमोद पत्रे, ओमराज हार्गुळे, महेंद्र खरकाटे, कैलास वानखेडे, विजय पिल्लेवान,अमर भर्रे, जितू चौधरी, लंकेश ढोरे, रेशीम प्रधान, आकाश पेटकुले, रोशन कवासे, गोपाल दोणाडकर आदी सह बहुसंख संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.सदर जनसंवाद व परिवर्तन यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन येत आहे.