लग्नावरून परतणाऱ्या दुकाकीला कारची जबर धडक….. अपघातात एक ठार दोन गंभिर जखमी

 

आरमोरी…. लग्न कार्य आटपून गावाकडे दुचाकीने परतणाऱ्या इसमावर काळाने झडप घातली. दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात दुचाकी वरिल एक इसम ठार तर दोघे जन गंभिर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान आरमोरी गडचिरोली राष्ट्रिय महामार्गावरील देऊळगाव जवळील पेट्रोल पंपाजवळ घडली. अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव संजय माधव धनकर वय ४० रा. वैरागड, असे असून गंभीर जखमी मध्ये सोपान हनु बावणे, वय २२ लोमेश नवघरे वय ४० यांचा समावेश आहे.

प्रप्त माहिती नुसार आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील पिंकु दुमाने यांचा सूर्यडोंगरी येथील एका मुलीसोबत सोमवारी लग्न होते. त्यामुळें मोहल्यातील युवकाचे लग्न असल्याने वैरागड येथील संजय धनकर, सोपान बावणे व गणेशपुर तेथील लोमेश नवघरे हे तिघेमित्र एम एच ३३ यू ८१०१ या क्रमांकाच्या दुचाकीने सूर्यडोंगरी येथे लग्नाला गेले होते. लग्न कार्य आटपून तिघेही दुपारी गावाकडे परत येत असताना आरमोरी गडचिरोली राष्ट्रिय महामार्गावर देऊळगाव जवळ समोरून येणाऱ्या एम एच ३२. ए एच ६६७७. या क्रमांकाच्यावर्धे वरुन गडचिरोली कडे जाणाऱ्या क्रेटा कार ने दुचाकीला जबर धडक दिली.त्यात दुचाकीवरिल तिघेही गंभिर जखामी झाले. तर कार ने धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली. अपघातानंतर दुचाकी वरील गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र गंभिर जखमी असलेल्या संजयला ब्रम्हपुरी येथे उपचारासठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेने लग्नकार्यात शोककळा पसरली.

अन अपघातानंतर मोटार सायकल नेलगेच घेतला पेट…..
कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्यानंतर दुचाकी वरील तिघेही उसळून पडले. त्यानंतर दुचाकीने लगेच पेट घेतल्याने रोडवरच नागरिकांनी बरनिंग चा थरार अनुभवला.यामध्ये दुचाकी जळून खाक झाली . त्यामुळें अपघातात एक जीव तर गेलाच शिवाय दोघे जखमी होऊन दुचाकीही जळाल्याने मोठें नुकसान झाले.