कोरची तालुक्यात हत्तीचे आगमन तीन शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान 

 

 

एका जंगली दंत हत्तीने घातला धुमाकूळ

 

कोरची

ओडिसा राज्यातील जंगली हत्तीचा कळप छत्तीसगडमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करून कोरची, कुरखेडा, धानोरा अशा तालुक्यातील ग्रामीण ठिकाणच्या शेतकऱ्यांचे जीवित हानी केली तसेच अनेक शेतकरीचे शेतीमालाचे, घराचे, धानपिकाचे, मोहफुलचे खूप नुकसान केले. आता या कळपाला वगडून पुन्हा एक जगली दंत हत्तीने शेतकऱ्यांचे नुकसान करण्यास सुरुवात केले आहे.

१८ जुलै च्या रात्री अंदाजे अकरा वाजता च्या दरम्यान कोरची तालुक्यातील अतिदुर्गम चरवीदंड व लेकुरबोडी या गावातील जंगल परिसरातील शेतीमध्ये येऊन येथील तीन शेतकऱ्यांचे एका दंत जंगली हत्तीने शेतमालाचे, सांदवाडीतील केळीचे तर मक्का पिकाची नुकसान केले आहे. या घटनेची माहिती बेडगाव वनविभागाला मिळताच १९ जुलै ला पहाटे सहा वाजता दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे तसेच वन विभागातील वन कर्मचारी लेकुरबोडी व चरवीदंड गावात जाऊन जंगल परिसरात आणि त्या भागामध्ये गस्त लावली होती.

लेकुरबोडी येथील नवलसाय फागु गावडे या शेतकरीचे सांदवाडीतील केळी पीक तसेच मक्का पिकाचे नुकसान तर चरवीदंड येथील आसाराम सितरु केरामी यांचे धान पिकाचे नुकसान व तुळसीराम सितरु केरामी यांच्या सांदवाडीतील मक्का पिकाचे खूप मोठे नुकसान केले आहे. या घटनास्थळावर वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे. यावेळी बेडगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांनी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले. पंचनामा करतेवेळी बेळगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल एम ठाकरे, नवेझरी क्षेत्र सहाय्यक ए एन जीवतोडे, मसेली क्षेत्र सहाय्यक आर पी कापकर, वनरक्षक एस एम दोनाडकर, एम एल गोखे, एस एस दातार, सी के चौधरी, आर के हलामी, व्ही एस कवडो, एन आर मीतलामी कर्मचारी उपस्थित होते.

परंतु या एक जंगली दंत हत्तीमुळे कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची जीवित हानी झाली नाही या परिसरामध्ये या हत्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सद्या अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे काम सुरू असून जंगल परिसरामध्ये शेतकऱ्यांची शेती आहे त्यांना शेतीत जावे लागते अशावेळी जंगलातील वन्य प्राण्यांचा भीतीसह आता या जंगली हत्तीची भीती नागरिकांमध्ये सनसरली आहे. मागील वर्षी या लेकुरबोडी गावातील एका वृद्ध महिला हत्तीने सोंडेत पकडून तिचे बळी घेतले होते. तर कोरचीच्या एका व्यापारीचे दुचाकीने प्रवास करताना बेडगाव घाटापुढील मार्गावर हत्तीने सोंडेने धक्का देऊन जखमी केले होते.

 

बेडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांची प्रतिक्रिया

सदर हत्ती हा एकटा असून त्याला कोणत्याही प्रकारे नागरिकांनी डिचवू नये तसेच फोटो काढण्यासाठी जवळ जाऊ नये व फटाके फोडू नये हत्ती विषयक काही माहिती असल्यास त्वरित वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात कळवावे.

लक्ष्मीकांत ठाकरे

वनपरिक्षेत्र अधिकारी

बेडगाव.