घर घर चलो अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडके बहिण योजना ग्रामीण भागातील प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवा.
दिनांक :- १३/०७/२०२४
गडचिरोली :- कोरची तालुका कार्यकारणी व समीक्षा बैठक जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली मोरेश्वर फाय विद्यालय कोरची येथे पार पडली.
जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी समीक्षा बैठकी मध्ये कार्यकर्त्यांसोबत संवाद साधले व त्यांच्या समस्या जाणून घेतले सोबतच कार्यकर्त्यांसोबत संघटनात्मक चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवत बोलले की लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव उमेदवाराचा पराभव नसून भारतीय जनता पक्षाच्या हजारो लाखो कार्यकर्त्यांचा पराभव या पराभवाला कार्यकर्त्यांनी खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागून संघटनात्मक बांधील बूथ रचना, बूथ सशक्तिकरण करण्याचे आवाहन केले.
राज्य सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिला करिता मुख्यमंत्री लाडके बहिण योजना चालू केली. या योजनेचा ग्रामीण भागातील प्रत्येक महिलांना लाभ मिळावा त्याकरिता घर घर चलो अभियानांतर्गत ग्रामीण भागामध्ये जाऊन योजनेची माहिती व महिलांचे फॉर्म भरून त्यांना सहकार्य करा असे आव्हान प्रशांत वाघरे यांनी कार्यकर्त्यांना केले.
त्याप्रसंगी बैठकीला जिल्हा सचिव आनंद चौबे, तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी,देवरावजी गजभिये, डॉ.एस के बिसेन, नारायणजी खंडेलवाल, शांती ताई मडावी, सुगनाताई कोटेंगे, शीलाताई सोनकोतरी,प्रमिलाताई मांडवे, जयाताई सहारे, मानुरम कुमरे मेघश्याम जमकातन, सदराम नूरुटी, फतेचंद घोडेवाला, स्वप्निल कराड़े प्रशांत कराडे टेमलाल देवांगन,खिलेश बागडेरिया,गोविंद दरवडे,नंदू जी पंजवानी,रामकुमार नाईक,सुरेश काटेंगे,संतोष सर्पा, रवी बंसोड ,रामलाल नुरूती ,मडावीताई सरपंच कोटरा ,साओजी बोगा ,मधुकरजी मेश्राम उप सरपंच कोटरा ,ईश्वर नुरूटी,मनोज जी टेंभूर्ने ,गजानंद जी भारद्वाज ,बापुजी उइके ,सरदारजी कमरे ,आसाराम जी शेंदे ,रामशिला राउत ,व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.