कोरची –
कोरची हे तालुक्याचे ठिकाण असून कोरची येथील कोचीनारा ते आश्रम शाळेला जाणारा रस्ता हा जिल्हा परिषद बांधकाम विभागा अंतर्गत येत असून सदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून यामुळे नागरिकांना याचा फटका बसत असून सामान्य जनतेला याचे नाहक त्रास सहन करावे लागत आहे.
दरवर्षी कोरची येथील मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात मोठ मोठे खड्डे निर्माण होत असून यावर कित्येक दुर्घटना सुद्धा घडत असते जे अत्यंत दुर्दैवी आहे. मागील काही वर्षांपासून या रस्त्यावर लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांना आपले जीव मुठीत घेऊन या रस्त्याने प्रवास करीत असून कित्येक नागरिकांना या खड्यांमुळे कमरेचा त्रास सुद्धा जाणवत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्य म्हणजे कोरची हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे परिसरातील नागरिक दररोज कोरची येथे शासकीय कामे व बाजार पेठेतील कामाकरिता कोरची शहर गाठत असतात परंतु या खड्यांमुळे त्यांना सुद्धा फटका मनस्ताप सहन करावा लागतो. शहरातील हा मुख्य रस्ता असल्यामुळे याच रस्त्याने शाळकरी विद्यार्थी सुद्धा याच मार्गाने शाळेत जातात ज्यामुळे कधी पण धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर बाब ही गंभीर असून याकडे गांभीर्याने लक्ष घालावे व तातडीने सदर रस्त्याचे काम सुरु करण्याकरिता शासन दरबारीं पाठपुरावा करून निधी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी गडचिरोली चिमूर लोकसभेचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांना काँग्रेस पक्ष कोरची चे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल यांनी दिल्ली येथे भेट घेऊन केली व आपण तातडीने पाठपुरावा करून सदर समस्येच्या निराकरणासाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन सुद्धा यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दिले.
मागील काही महिन्यांपासून नागरिकांना रोजगार हमीचे हप्ते मिळाले नसून काही घरकुल लाभार्थी सुद्धा हफ्ते न मिळाल्यामुळे चिंतेत असल्याचे दिसून येत असून त्या समस्या सुद्धा आपण मार्गी लावण्यास पाठपुरावा करावा अशी मागणी मनोज अग्रवाल यांनी यावेळी डॉ. किरसान यांना केली.याप्रसंगी काँग्रेस नेते रामदास मसराम उपस्थित होते.