: कोरची ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या डॉक्टरला बलात्कारप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. आतिश पंकज सरकार (वय २६, रा. कोरची) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी आतिश सरकार याने पीडित २२ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित युवतीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. युवतीकडील मंडळींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मानण्यास तयार नव्हता. शेवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याशिवाय पीडित युवतीकडे पर्याय नव्हता.