घरोघरी तिरंगा – 2024″🇮🇳मोहीम अंतर्गत जनजागृती

 

कोरची ::

येथील स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथे “हर घर तिरंगा “मोहिमे अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा ” ही मोहीम सुरु करण्यात आली. ही मोहीम लोकांना आपल्या घरी आणण्यासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्याची ओळख म्हणून तो फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत व्हावी आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांबद्दल प्रत्येक नागरिकाच्या मनात आदराची भावना निर्माण व्हावी याकरिता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची आणि नगरपंचायत कोरची यांच्या संयुक्त विदयमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तिरंगा रॅली, तिरंगा बाईक आणि सायकल रॅली, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा प्रतिज्ञा, चित्रकला स्पर्धा, तिरंगा सेल्फी, प्लास्टिक मुक्त शाळा हे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत विविध खेळ , महावाचन चळवळ आणि वृक्षारोपण करण्यात आले. मा. नंदकिशोर वैरागडे समाजसेवक यांच्या उपस्थितीत बाईक रॅली संपन्न झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमोदिनी काटेन्गे,शिक्षिका कांता साखरे, मेघा बुराडे, आरती चांदेकर शिक्षक मारोती अंबादे, विनोद भजने, महेश जाळे आणि मनीषा नखाते अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कोरची तथा सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती कोरची यांनी परिश्रम केले.