कोरची :-
इस्लाम धर्मात ईद मिलाद-उन-नबी हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ईद मिलाद-उन-नबी हा इस्लामिक कॅलेंडरचा तिसरा महिना, रबी अल-अव्वालच्या 12 तारखेला साजरा केला जाणारा एक विशेष इस्लामी सण आहे. या दिवशी मुस्लिम समाजात विशेष प्रार्थना, समारंभ आणि उत्सव आयोजित केले जातात. कोरची येथे सुद्धा मुस्लिम बांधवातर्फे मिरवणूक काढून ईद साजरी करण्यात आली.
कोरची येथे प्रत्येक धर्म हे एकोपा ठेऊन सण उत्सव साजरे करीत असल्याचे नेहमी बघायला मिळते आज सुद्धा या ईद निमित्य मुस्लिम बांधवांच्या मिरवणुकीदरम्यान काँग्रेस पक्ष कोरची तर्फे शरबत वाटप करून सर्व मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तालुका काँगेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल,जिल्हा उपाध्यक्ष सदरूद्दिन भामानी,नगरसेवक दिलीप मडावी, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष धनिराम हिडामी,केवल भैसारे, माजी नगरसेवक परदेशी बघवा, गोपाल मोहूर्ले,अरुण मोहूर्ले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.