कोरची शहरात क्रांतीसुर्य यांना विनम्र अभिवादन

कोरची:-
कोरची शहरातील महात्मा फुले चौक येथे
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यामध्ये बालगोपाल त्याचप्रमाणे सर्व माळी समाजातील व कोरची शहरातील सर्व जनतेने उपस्थिती दर्शवून सहकार्य केले,
महात्मा ज्योतिराव फुले यांना दीपप्रज्वलित त्यांच्या प्रतिमेला माल्ह्यार्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यानंतर गौरव कावळे ,आशिष अग्रवाल, जितेंद्र सहारे तसेच केशव मोहूर्ले यांनी क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर सखोल मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे डा. सुधाकर हिडामी यांनी ज्योतीराव फुले यांच्या मार्गदर्शनातून बोलतांनी जाती जाती मध्ये असलेल्या मतभेदा विषयी सर्व समाज एकत्र येऊन मानव जात एकच आहे असे सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक राकेश मोहूर्ले यांनी केले तसेच आभार संतोष मोहूर्ले यांनी मानले यावेळी उपस्थित प्रमुख श्रीहरी मोहूर्ले, अजित मोहूर्ले, नाशिक नागमोती,मानिराम मोहूर्ले, छत्रपती बांगरे,हंसराज मोहूर्ले हे होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाज बांधव तसेच कोरची शहरातील सर्व जनतेनी सहकार्य केले