चामोर्शी येथील रहिवासी प्रा. अभिषेक ईश्वर दुर्गे यांची ‘इंटरनॅशनल कॉन्फरंस ऑन इनविरोनमेंटल ऑर्गनिक केमिस्ट्रि अँड टेक्नॉलजी’ या परिषदेकरिता नियुक्ती झालेली आहे.

. ही परिषद सात दिवसा करीता अमेरिका येथील लास व्हेगस या एप्रिल २०२४ या महिन्यात होणार आहे. दिनांक ९ ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान मुंबई येथे झालेल्या इंटरनॅशनल कॉन्फरंस ऑन केमिकल सायन्स अँड एड्युकेशन’ या परिषदेत सहभाग घेऊन आपले रिसर्च पेपर्स प्रदर्शित करून संपूर्ण चमूचे लक्ष वेधले. या परिषदेनंतर त्यांच्या रिसर्च ची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावी या करिता त्यांची निवड एप्रिल महिन्यात अमेरिका देशात होत असलेल्या परिषदेकरीता त्यांची निवड करण्यात आलेली आहे.

 

प्रा. अभिषेक दुर्गे हे मूळचे चामोर्शी येथील रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलचेरा येथे झाले. इयत्ता ५ वी मध्ये जवहार नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत गडचिरोली जिल्हयाततील घोट येथील जवाहर नवोदय विद्यालय घोट ६ वी ते १० वी पर्यतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण नागपुर येथे घेत बी. एससी. आणि पुढे रसायन शास्त्र विषयात २०२१ मध्ये एम. एससी. पूर्ण केले. २०२२ मध्ये NET आणि २०२३ मध्ये SET परीक्षा उत्तीर्ण होत वयाच्या २५ व्या वर्षी पदव्युत्तर पदवी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या पदावर संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ येथे रुजू झाले. सध्या प्रा. अभिषेक दुर्गे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विध्यापीठ संलग्णीत शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथे रसायन शास्त्र या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

 

त्यांनी केलेल्या संपूर्ण कार्याचे श्रेय आई-वडील, प्राचार्य, तथा सर्व सर्व सहाय्यक गण आणि मित्र परिवाराला देत पुढील वाटचाल अशीच सुरु राहावी या करीता त्यांना खूप खूप शुभेच्छा…