सोनार समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत करिअर करावे-भाग्यश्री तारेकर

 

आरमोरीत संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव थाटात

संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची निघाली शोभायात्रा

आरमोरी- सराफा व्यवसाय हा सोनार समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे.सोनार समाजातील विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या परंपरागत व्यवसायावरच अवलंबून न राहता उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत करिअर करून समाजाचा सर्वांगीण विकास साधावा. असे प्रतिपादन नागपूर येथील सोनार महिला समाज बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री तारेकर यांनी केले.

त्या आरमोरी येथील साई दामोदर मंगल सभागृहात सोनार समाज शाखा आरमोरीच्या वतीने घेण्यात आलेल्या संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

कार्यक्रमाचे उदघाटक नागपूर येथील ऋग्वेद सुवर्ण वार्ताहर दिलीप येवले तर प्रमुख अतिथी आरमोरी न.प.चे माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे,आ. कृष्णा गजबे यांच्या सौभाग्यवती विद्याताई गजबे,आरमोरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे,सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक बेहरे, नागपूर येथील सोनार समाज बहू.संस्थेच्या सचिव कल्पना भोरकर,उपाध्यक्ष वर्षा अनासाने, सविता मानेकर, वनश्री तारेकर,सोनार समाजाचे अध्यक्ष पंकज खरवडे, सरचिटणीस मदनकुमार काळबांधे, सोनार समाजाच्या महिलाअध्यक्षा प्रीती गजपुरे,महिला सचिव सुनीता काळबांधे, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे म्हणाल्या की, आज समाजातील महिला चुल आणि मूल सांभाळून सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. शिक्षण घेवून लहान मोठ्या पदावर नोकरी करीत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी होऊन उद्योगशील झालेल्या आहेत. राजकिय क्षेत्रात सुध्दा नावलौकिक मिळवित आहेत. सोनार समाजातील महिलांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन महिलांनी सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा.

उदघाटक येवले म्हणाले की,समाजाची प्रगती करायची असेल तर सोनार समाजातील सर्व पोटशाखांनी एकत्र येण्याची गरज आहे.

कार्यक्रमापूर्वी श्रीराम मंदिर देवस्थान येथून श्री संत नरहरी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक व शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गावरून टाळ- मृडुंगाच्या सुरात जय नरहरी च्या घोषणात काढण्यात आली.यावेळी समाजाच्या सपुरुषांनी शुभ्र,व भगवी टोपी व महिलांनी भगवी साडी परिधान केले होते. त्यामुळेया मिरवणुकीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडून आले.व या शोभयात्रेचा समारोप साई दामोदर मंगल कार्यालयात करण्यात आला.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून समाजातील सेवानिवृत्त उमेश हर्षे,तुळशीदास काळबांधे,रमेश इन्कने, रामकृष्ण बेहरे, किशोर हाडगे, जयश्री बेहरे, विनायक काळबांधे, कुंभलवार गुरुजी यांचा समाजाच्या वतीने शाल,श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आ.कृष्णा गजबे यांच्या सौभाग्यवती विद्याताई गजबे यांना समाजाच्या वतीने साडीचोळी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

१० वी मध्ये शिवम खापरे प्रथम,सानिया बेहरे द्वितीय कल्याणी काळबांधे तृतीय, तसेच १२ वी मध्ये भार्गवी राचमलवार प्रथम, वैदेही काळबांधे द्वितीय , तर तनुश्री बेहरे हिने तृतीय क्रमांक पटकविल्याने यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.रांगोळी स्पर्धेत ज्योती मस्के प्रथम,श्रद्धा काळबांधे द्वितीय,प्रतीक्षा हाडगे तृतीय, वक्तृत्व स्पर्धेत उमेश हर्षे प्रथम,राजू बेहरे द्वितीय तर सविता खापरे तृतीय, वेशभूषा स्पर्धेत स्वरा बेहरे प्रथम, खरवडे द्वितीय तर अप्सरा बेहरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. सर्वच स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला आरमोरी तालुक्यातील सोनार समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.व कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनार समाजाचे सचिव मदनकुमार काळबांधे,संचालन राहुल इन्कने,सूत्रसंचालन आरजु इन्कने, तर आभार कोषाध्यक्ष प्रफुल खापरे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद बेहरे, अजय काळबांधे, हरिहर काळबांधे, अंकुश खरवडे,विनोद बेहरे, दिलीप श्रीरंगे, सुनीता काळबांधे, चंदा खापरे,ओंकार इन्कने, अभिजित बेहरे, राहुल हर्षे,कुणाल भरणे,अक्षय बेहरे, शुभम इन्कने, मंगेश बांगरे, अभिषेक हर्षे,निर्मला काळबांधे,संतोष करंडे , बबन बेहरे, चंदू हर्षे, मयूर बेहरे, अभिषेक हर्षे, सुनिता काळबांधे, सविता खापरे, ज्योती हाडगे, चंदा खापरे, संध्या काळबांधे,रोशनी काळबांधे ,कोमल हर्षे ,अनिता बेहरे, अवनी डुंबरे ,चंदा खरवडे, प्रतिभा खरवडे तसेच समाजातील सर्व समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले.