नगर परिषद आरमोरी कडून शासनाच्या “स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

 

 

आज दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी, डॉ.माधुरी सलामे यांच्या आदेशान्वये स्थानिक नगर परिषद कार्यालयामध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गायकवाड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,गौरी साळवे, रमा ढोके, समुपदेशक आशिक वासनिक,किरण दहीकर,सरिता मंदाडे आणि रक्षा उंदिरवाडे इत्यादी तसेच नगर पालिकेचे सर्व सफाई कर्मचारी व अधिकारी यांचे आरोग्य तपासणी करून बिपी,मधुमेह, एचआयव्ही, सिकलशेल,थायराइड अशा विविध आजाराच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. शिबिराकरिता कार्यालय अधिक्षक श्री.प्रितेश काटेखाये, बांधकाम अभियंता श्री.अविनाश बंडावार,संगणक अभियंता श्री.आशिष हेमके, विद्युत अभियंता श्री.कौस्तुभ रोकमवार,कर अधिक्षक श्री.जिवन शिंदे, आरोग्य निरीक्षक श्रीमती नितेश सोनवणे, सिटी को-ओर्डीनेटर शहेराज पठाण, तांत्रिक समन्वयक कुलदीप कुकुडकार, श्री.राजू कांबळे श्री.ज्ञानेश्वर दुमाने,सुधीर सेलोकर,कु.अनिता भडके,लिपिक, अशाप्रकारे सुमारे 100 व्यक्तींच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.