शिवानी ची आत्महत्या नसून ही हत्या, ऍट्रॉसिटी लावून दोषीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. – आझाद समाज पार्टी ची मागणी 

 

_________________

आरमोरी पोलीस स्टेशन वर धडक

_________________

आरमोरी : कुकडी येथे शिवानी कोवे नामक 17 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीला शोषणा मुळे आत्महत्या करावी लागली. त्यामुळे शोषण करणाऱ्या प्रशांत भोयर (35 वर्ष ) नामक नराधमावर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आझाद समाज पक्षाच्या वतीने आरमोरी पोलीस निरीक्षक यांचेकडे करण्यात आली.

 

पिडीत मुलीचे आई वडील घरी नसताना दोषीची पत्नी, आई व वहिनीने 4 ऑक्टोबर रोजी शिवानी कोवे हिच्या घरात घुसून तिला मारहाण केली व धमकी सुद्धा देण्यात आली. त्यामुळे सदर मारहाण करणाऱ्यांवर सुद्धा ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे आणि या प्रकरणामुळे शिवानी ने बदनामीच्या भीतीपोटी आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्याच आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व आरोपी वर कठोर कारवाई करावी आणि कुठल्याही राजकीय दबावात न येते मुलीला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

 

आदिवासीच नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याही समाजाच्या मुलीवर जर असा अन्याय होत असेल तर आझाद समाज पार्टी त्याविरोधात संघर्ष करत राहील असे आझाद समाज पार्टी कार्याध्यक्ष विनोद मडावी यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके , आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषीभाऊ सहारे, जिल्हा सचिव दिनेश बनकर, गडचिरोली विधानसभा प्रभारी धनराज दामले, आरमोरी तालूका कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मैंद, युवा आघाडी प्रमुख शुभम पाटील, उपाध्यक्ष पियुष वाकडे, शहराध्यक्ष नितीन भोवते, मिडीया प्रभारी सतीश दुर्गमवार व पीडिताचे आई, वडील उपस्थित होते.