मृत्यूच्या दरात उभ्या असलेल्या रुग्णासाठी धावले आदिवासी डॉक्टर

 

असलेल्या रुग्णासाठी धावले आदिवासी डॉक्टर

डॉ. आशिष कोरेटी यांनी वाचविले रुग्णाचे प्राण

 

आरमोरी…शरीरात अवघे २.४ ग्राम रक्ताचे अल्प प्रमाण , अँनीमियाने ग्रस्त असलेला रुग्ण गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती होता. त्याच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण अतिशय झपाट्याने कमी झाले. त्याला कोणत्याही परिस्थितीत तात्काळ रक्त देणे गरजेचे होते. मरनाच्या दारात उभ्या असलेल्या रुग्णाला रक्ताची नितांत गरज आहे हे माहीत होताच कसलाही विलंब न लावता डॉ.आशिष कोरेटी यानी lगडचिरोली येथे सामान्य रुग्णालय गाठून रक्तदान केले. त्यामुळे रुग्णाला वेळेवर रक्त मिळाल्याने रुग्णाचे जीव वाचले .

वडसा येथील आतिश सडमाके वय २७ हा रुग्ण गेल्या दोन दिवसापासून गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती आहे. सदर रुग्ण अँनिमियाने ग्रस्त असून त्याच्या शरीरात फक्त २.४ ग्रॅम रक्त होते त्याचा ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह हा असल्याने या गटाचे रक्त मिळणे कठीण झाले होते. त्यामूळे रूग्नाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता . ही बाब डॉ. आशिष कोरेटी याना माहीत होताच आपली सर्व महत्वाची कामे बाजूला ठेवून रुग्णाच्या जीवासाठी त्यांनी आरमोरी वरून गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात जाऊन शुक्रवारी रक्तदान केले .रक्तदानानंतर रुग्णाला तात्काळ रक्त मिळाल्याने त्याचा जीव वाचला. एका आदिवासी रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी आदिवासी डॉक्टर धावल्याने डॉक्टर आशिष कोरेटी यांच्यामुळे रूग्णाला वाचविणे शक्य झाले.

एक वैद्यकीय अधिकारी म्हणून सामाजिक व आरोग्य क्षेत्रात डॉ. आशिष कोरेटी गेल्या अनेक वर्षापासून कार्य करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याकडे त्यांचा नेहमीच कल राहिलेला आहे. आदिवासी दुर्गम भागात त्यांनी अनेक आरोग्य शिबीर घेऊन मोफत आरोग्य सेवा पुरवीत आहेत .डॉ कोरटी यांनी आजपर्यंत ५४ वेळा रक्तदान सुद्धा केले आहे.

 

अपघात ग्रस्त जखमींना केले रुग्णालयात दाखल

 

डॉक्टर आशिष कोरेटी हे रक्तदान करण्यासाठी गडचिरोली येथे जात असताना देऊळगाव जवळ खराब रस्त्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघात झाला. आणि ते जखमी झाले होते लगेच डॉ.आशिष कोरेटी यांनी जखमींना आपल्या वाहनात बसवून गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले त्यामुळे वेळेत उपचार मिळाल्याने दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.