लॉयड्स मेटलस् अँड एनर्जी लिमिटेड च्या वतीने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

दिनांक १/१२/२०२४ ला लॉयड्स मेटलस् अँड एनर्जी लिमिटेड लोहखान, सुरजागड च्या वतीने मौजा हेडरी येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला माननीय पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी भाषणातून आपल्या महाराष्ट्र राज्याच्या टोकावर नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्हयातील एटापल्ली तालुक्यात सुरजागड सारखा एवढा मोठा लोहप्रकल्प उभारून बेरोजगार लोकाना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लॉयड्स मेटलस् अँड एनर्जी लि. चे व्यवस्थापकीय संचालक मान. श्री.बी. प्रभाकरन सरांचे आभार मानले. लॉयड्स मेटलस् अँड एनर्जी लिमिटेड कडून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करणे ही एक उत्कृष्ट कल्पना आहे. स्पर्धेचा उद्देश कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये आरोग्य जागरूकता वाढवणे हा युवकांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण करण्याच्या हेतूने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेमध्ये सर्वानी सहभाग घेवून आपले आरोग्य सुधृढ राहण्यासाठी प्रयत्न करावे, असे मत व्यक्त केलेत. 

माननीय श्री.बी. प्रभाकरन, व्यवस्थापकीय संचालक लॉयड्स मेटलस् अँड एनर्जी लि. लोहखान, सुरजागड यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मिनी मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात करण्यात आली. सदर मिनी मॅरेथॉन वयाच्या गटानुसार घेण्यात आल्याने १८ ते ५५ या वयोगटातील सर्व कंपनीच्या सर्व महिला – पुरुष अशा १३०० कर्मचाऱ्यानी सहभाग घेतला. मीनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याना स्पर्धेच्या निमित्ताने एक टी-शर्ट चे वितरण केल्यानंतर सर्वानी गटानुसार टी-शर्ट घालून स्पर्धेत सहभाग नोंदविला. मॅरेथॉन स्पर्धा आयोजन सि एस आर कॉम्प्लेक्स हेडरी पासून लोहखान सुरजागड कंपनी पर्यंत ५ किमी अंतरात घेण्यात आली. सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन मार्गावर ग्लुकोज,फळ देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पहुने म्हणून सौ.अरुणाताई सडमेक सरपंच ग्रा.पं. पुरसलगोंदी, श्री.राकेश कवडो उपसरपंच ग्रा.पं. पुरसलगोंदी, कु.वनिता ताई कोरामी सरपंच ग्रा.पं. तोडसा, श्री.नेवलुजी पाटील गावडे सरपंच ग्रा.पं.नागुलवाडी, श्री.विनोद नरोटे ग्रा. प. सदस्य तोडसा, श्री.सि.कुमरेसन, श्री.एस. व्यंकटेश्वरण, श्री. साई कुमार, श्री. भोलू भाऊ सोमनानी, श्री.संजय चांगलानी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेत विजेत्यांना शिल्ड, मेडल, बक्षीस देवून गौरविण्यात आले. सोबतच याप्रसंगी लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी मध्ये २७ वर्ष सेवा देणारे माननीय के.सत्याराव सर आज निवृत्ती घेत असल्याचे घोषित केल्याने त्यांचे शॉल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या दरम्यान माननीय श्री.बी. प्रभाकरन सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडकडून झालेल्या आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत आपल्या कंपणीचे सर्व महिला – पुरुष कर्मचाऱ्यानी सहभाग घेतला. मला खूप आनंद झाला आणि ही मोठी गौरवाची बाब आहे. या पुढे स्थानिक समुदायात सकारात्मकता, जोश, उत्साह आणण्याकरिता नेहमी अश्या स्पर्धेचे आयोजन करीत या भागातील युवक – युवती करीता एक उत्तम प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच मानस असल्याचे सांगितले. पण त्या करीता फक्त आपली तयारी पाहिजे, आपण सगळे मिळून सोबत काम करत राहू.. फक्त मला आपल्या लोकांचा साथ पाहिजे.. तेव्हा मलाही आपल्या मनासारखा काम करता येईल व जे पाहिजे आहे ते साध्य करण्याच प्रयत्न करीन. अस आव्हान व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सौरव वालीया यांनी तर आभार प्रदर्शन कु. जानवी शेंडे यांनी केले समस्त कार्यक्रमाला सर्व कर्मचाऱ्यानी प्रामुख्याने सहभाग घेवून सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.