वेणुताई ढवगाये, मेघा मने सह महिलांचा इशारा…
उपकार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन
आरमोरी….. आरमोरी शहरात वारंवार खंडीत होणारा विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच ३३केव्हीं ऐवजी १३२ केव्ही विजकेंद्र कार्यान्वित करुण आरमोरी शहराला विज पुरवठा करण्यात यावा. वारंवार होणारी विजेची समस्या पंधरा दिवसांच्या आत निकाली न काढल्यास तीव्र उपोषण करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सभापती वेणूताई ढवगाये व माजी ग्रामपंचायत सदस्या मेघा मने यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता बोबडे यांच्याशी चर्चा करूया दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आरमोरी शहरवासीयांना दरवर्षी उन्हाळयात विजेची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. आता उन्हाळ्याचे दिवस सूरू असल्याने दिवस रात्र विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या विजपुरवठाचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत असते . विजेच्या कमि दाबामुळे कुलर, पंखे ही काम करित नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील चानोर्शी, गडचिरोली, वडसा कुरखेडा आदि ठिकाणीं १३२ केव्ही वरुन विजपुरवठा होतो. मग आरमोरी शहरात गेल्या वीस वर्षांपासून १३२केव्हीचे विजकेंद्र कार्यान्वीत का करन्यात आले नाही असा प्रश्नही यावेळी उपस्थीत करन्यात आला.
यावेळी वारंवार खंडीत होणाऱ्या विजेच्या समस्येबाबत वेणूताई ढवगाये, मेघा मने व ईतर महीलानी उपकार्यकारी अभियंता बोबडे यांच्याशी चर्चा केली व विजेचा सुरळीत पुरवठा करुण सदर समस्या तात्काळ १५ दिवसाच्या निकली काढा अन्यथा विज वितरण कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा दिला.
यावेळी कृषी पंपामुळे विजेवरील भार वाढल्याने खंडीत विज पुरवठयाची समस्या निर्माण झाली असून सदर समस्या तात्काळ निकली काढून सुरळीत विज पुरवठा करू असे आश्वासन उपकार्यकारी अभियंता बोबडे यानी दीले.
निवेदन देतेवेळी माजी जिल्हा परिषद सभापती वेणूताई ढवगाये, माजी ग्रामपंचायत सदस्या मेघा मने, सारिका मारभते, सूनंदा रामटेके, शारदा चंडीकार,, ज्ञानेश्र्वर ढवगाये, मेघा दिपक मने, सुषमा गेडाम, गीता भोयर निर्मला दुमाणे, रमाबाई खोब्रागडे, शिल्पा खोब्रागडे, वर्षा मेश्राम, इंदिरा खोब्रागडे आदी महीला उपस्थीत होत्या.