बुद्धगया येथील महाबोधीं विहार समितीच्या वतीने राजकुमार शेंडे यांचा सन्मान

 

आरमोरी… गडचिरोली जिह्यातील बौध्द धम्माचे अभ्यासक प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे यांनी बुद्ध जयंतीला बिहार राज्यातील बौध्दगया येथील महाबोधी विहाराला भेट दिली असता महाबोधी विहार समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी कालचक्र मैदानावर जमलेल्या हजारो भिक्खूसंघ व लाखो बौध्द अनुयायांना मार्गदर्शन करण्याची संधीही राजकुमार शेंडे याना देण्यात आली. याचबरोबर महाबोधी ट्रस्ट कमेटीवर घेण्याचे सूतोवाच ट्रस्ट समितीने दिले आहे.

तथागत गौतम बुद्धाला बुध्दगया येथील पिंपळ वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले .त्यामुळे जागतीक दर्जाचे स्थळ असलेले बौध्दगया येथील महाबोधी विहार हे भारतातील प्रमुख बौद्धिक स्थळ असून देशातील बुध्द धम्माचे प्रेरणास्थळ आहे. बिहार राज्यातील महाबोधी विहाराला प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे यांनी बुद्ध पौर्णिमेला भेट दिली. तसेच ज्या पिंपळ वृक्षाखाली तथागत गौतम बुद्धाला ज्ञानात्व प्राप्त झाले त्या ठिकाणाला भेट देऊन त्यानी वंदन केले
.
यावेळी महाबोधी विहार ट्रस्ट समितीच्या वतीने डॉ. राजकुमार शेंडे यांचा सन्मान करन्यात आला. यावेळी कालचक्र मैदानावर आयोजित बुध्द जयंती महोत्सवात हजारो भिक्खूसंघ व लाखो बौद्ध अनुयायांना त्यांनी बौद्ध धम्मावर मार्गदर्शन केले.. बुध्द गया मुक्ती आंदोलनं समितीचे राष्ट्रिय अध्यक्ष तथा भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत आनंद महास्थविर यानी महाबोधी ट्रस्ट समितीवर राजकुमार शेंडे याना घेण्याचे सुतोवाच दिले. यावेळी त्यांच्यासमवेत ब्रम्हपुरी (संघभूमी) येथील भंते धम्मप्रिय उपस्थित होते.

गडचिरोली जिह्यातील प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे यांच्या रूपाने बौध्दगया येथील महाबोधी विहारात मार्गदर्शन करणारे हे जिल्ह्याच्या इतिहासातील एकमेव व्यक्ती आहेत.