शेतकरी पिक विमा पोर्टल तिनं दिवसांपासून बंद असल्याने सुरू करून मुदतवाढ देण्यात यावे

 

 

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी 

 

आरमोरी – नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. अशा वेळी शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारच्या वतीने ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ सुरू करण्यात आली. या पूर्वी पिकविम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, यंदा एक रुपयात पिकविमा काढून मिळत आहे सध्या शेतकऱ्यांनी खरीप धान ईतर पिकाची पेरणी केली आहे. या पिकाला संरक्षण मिळावे, यासाठी ‘पीकविमा भरण्याची शेवटची मुदत ३१ जुलै आहे. असताना गेल्या 21 तारखेपासून पिक विमा ऑनलाईन पोर्टल बंद असल्यामुळे आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा पळसगाव पाथरगोटा शंकर नगर रामपुर कासवी आष्टा अन्य गावातील शेतकरी शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित असल्यामुळे तिन दिवसांपासून बंद असलेले पिक विमा पोर्टल सुरू करून मुदतवाढ देण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या कडे निवेदनातून केली आहे.

 

दरवर्षी शेतकऱ्यांना खरीप धान व इतर पिक घेत असताना अतिवृष्टी किवा नदि नाल्याचे पुराने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होतो परंतु शेतकरी पाहिजे त्या प्रमाणात पेसे अभावी पिक विमा योजनेचा लाभ घेत नव्हते त्यामुळे त्यांची नुकसान झाली तरी पण मोबदला मिळत नव्हता म्हणून शासनाने या वर्षात 1 रुपयात शेतकरी पिक विमा देण्याचा निर्णय घेऊन यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे परंतु यासाठी ‘पीकविमा भरण्याची शेवटची मुदत ३१ जुलै आहे. असताना गेल्या 21 तारखेपासून पिक विमा ऑनलाईन पोर्टल बंद असल्यामुळे आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा पळसगाव पाथरगोटा शंकर नगर रामपुर कासवी आष्टा अन्य गावातील शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित असल्यामुळे तिन दिवसांपासून बंद असलेले पिक विमा पोर्टल सुरू करून मुदतवाढ देण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या कडे निवेदनातून केली आहे.

यावेळी हरीदास बावणे मोरेश्वर मेत्राम सोपान गेडाम लालाजी मेत्राम धोडु तोडरे मुखरु उरकुडे कितीलाल गरफडे गुरूदेव राऊत केशव खरकाटे प्रदिप सडमाके खुशाल ठाकरे यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.