जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या महात्मा गांधी मानवसेवा, पुरस्काराने ॲड रवींद्र दरेकर सन्मानीत!..

 

गांधी केवळ व्यक्ती नाही तर गांधी हा विचार आहे!…. ॲड रवींद्र दारेकर

 

महात्मा गांधी संपणारा विषय नसून गांधी विचारास अंत नाही – ॲड रवींद्र दरेकर…

 

आरमोरी

.. गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या व मनोहर शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरीच्या वतीने दिला जाणारा सन २०२३ चा “महात्मा गांधी मानवसेवा पुरस्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड रवींद्र दरेकर यांना गांधी जयंती दिनी प्रदान करण्यात आला.. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना रवींद्र दरेकर यांनी महात्मा गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वातील सत्य, अहिंसा आणि प्रेम या मूल्यांचा अंत कदापि होणार नाही कारण गांधी केवळ व्यक्ती नाही तर गांधी हा विचार आहे. गांधी यांचे जीवन समाजाने आत्मसात करणे आजच्या वर्तमानाची गरज असताना गांधींविषयी गैरसमज निर्माण करून विष पेरण्याचे कार्य विशिष्ठ पक्ष आणि गटाकडून होत आहे. असे जरी असले तरी गांधी संपणार नाही हे तितकेच सत्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले

 

 

स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री संयुक्त जयंती समारंभ साजरा करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरीचे सचिव मनोज वनमाळी हे होते तर, प्रमुख वक्ते म्हणून माजी प्राचार्य डॉ. नामदेव कोकोडे, संस्थेचे उपाध्यक्ष नुरअल्लीभाई पंजवानी, दिपक बेहरे, दीपक वनमाळी, मयूर वनमाळी, निशांत वनमाळी, प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार, प्रकाश पंधरे, नितीन कासार, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.शशिकांत गेडाम उपस्थित होते.

 

यावेळी ॲड.रवींद्र दरेकर यांनी सत्काराला उत्तर देताना मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिवाय या शिक्षणसंस्थेचे कार्य आणि वाटचाल समाजात मूल्यसंस्कार रुजविणारी असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित डॉ. नामदेव कोकोडे यांनी गांधी जीवन आणि कार्य यावर भाष्य केले त्यांनी गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांतील समान दुवे उपस्थितांना पटवून दिले. अध्यक्षीय मनोगतातून संस्थेचे सचिव मनोज वनमाळी यांनी यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले व पुढेही विद्यार्थ्यांत आणि समाजात मूल्यसंस्कार रुजविण्यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी ठरतील. असा आशावाद व्यक्त केला. आणि अशा उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे असे स्पष्ट केले.

 

समारंभात ॲड रवींद्र दरेकर यांना महात्मा गांधी मानव सेवा पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. यापूर्वी हा पुरस्कार डॉ.राणी बंग, गिताचार्य लक्ष्मणदादा नरखेडे , माजी आमदार हरिराम वरखेडे याना प्रदान करण्यात आला होता.

 

गोंडवाना विद्यापीठ परीक्षेत महाविद्यालयातून कला, विज्ञान व वाणिज्य शाखेत प्रथम येणाऱ्या अनुक्रमे गायत्री चौके, शुभांगी निमजे व हिमान्द्री गाईन शिवाय महाविद्यालयाद्वारे आयोजित स्पर्धारत्न सामान्यज्ञान परीक्षेत यशवंत विद्यार्थी हेमंत हारगुडे, लोकेश कौशिक, नीलम टेकाम यांचा पुरस्कारराशी, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

जयंती कार्यक्रम निमित्तानं सकाळी सहा वाजता रा. से.यो. च्या वतीने आरमोरी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सकाळी आरमोरी येथील गांधी चौकात गांधीना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गांधी झाकी, चांद्रयान, विविध वेशभूषा, वर्तमान प्रश्न यावरचे पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले व परिसरात भव्य रॅली काढण्यात आली. तद्नंतर महाविद्यालयातील महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, तुकडोजी महाराज व स्व. वामनराव वनमाळी, स्व. किशोर वनमाळी याच्या पुतळ्यांना व प्रतिमांना अभिवादन केले गेले व नंतर जयंती कार्क्रम महाविद्यालय सभागृहात पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी केले. त्यांनी आयोजनाची भूमिका स्पष्ट केली सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजय रैवतकर यांनी केले. आभार प्राचार्य साईनाथ अद्दलवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी सांकृतिक विभागप्रमुख प्रा. शशिकांत गेडाम, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, डॉ. गजेंद्र कढव, प्रा. डॉ. नोमेश मेश्राम, रा. से. यो. प्रमुख प्रा. सत्येंद्र सोनटक्के, डॉ. सीमा नागदेवे, प्रा. पराग मेश्राम, प्रा. मोहन रामटेके, डॉ. सी. डी. मुंगमोडे, डॉ. विजय गोरडे, प्रा. स्नेह मोहुर्ले, प्रा. वैभव पडोळे, प्रशांत दडमल, किशोर कुथे, सचिन ठाकरे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.