नूतन शारदा मंडळ देऊळगाव ची टीम निघाली मथुरेला

आरमोरी :—-

तालुक्यातील मौजा देऊळगाव येथील नूतन शारदा मंडळ मथुरा वृंदावन येथील अखंड पावन ज्योत आणायसाठी नुकताच काही दिवसापूर्वी या मंडळाचे पदाधिकारी मथुरेला रवाना झालेले आहेत सदर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मथुरेला जाण्यासाठी एका ट्रॅव्हलची व्यवस्था करण्यात आली असून या ट्रॅव्हल्सला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी या मंडळाचे पदाधिकारी आयोजक श्री कवडू भाऊ साहारे माजी उपसरपंच तसेच सरपंच शामादेवी कवडू सहारे मंडळाचे पदाधिकारी लोमेश हरडे नामदेवजी निंदेकर नूतन शारदा मंडळाचे अध्यक्ष वंदनाबाई कामतकर आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावकरी मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर वृंदावनातून आणण्यात येणारी अखंड पावनज्योत घेऊन दिनांक 15/ 10/ 2023 ला परत देऊळगाव येथे आगमन होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने 15 आक्टोंबर रोजी देऊळगाव येथे उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे