आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथील शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत चालावा म्हणून कोणताही रोजगार नसल्यामुळे स्वतःच्या शेतीत दिवसरात्र मेहनत घेऊन चांगले उत्पत्न येईल या आशेवर मेहनत घेतली.
गेल्या दोन दिवसापासून टस्कर हत्तींचा कळप शेतामध्ये धुमाकूळ घालत आहेत.या हत्तीकडून हातातोंडाशी आलेली पिके फस्त होत आहेत.
टस्कर हत्तीच्या कळपाने पेठतुकुम येथील शेतकरी श्री राजीराम वट्टी यांची शेती जंगलालगत लागून आहे. पावसाळी धान रोवणी केल्यानंतर निद्दा काढून कीटकनाशक व खत यांचे व्यवस्थापन योग्यप्रकारे केले.
धान पीक हातातोंडाशी आलेली असताना .
त्यांच्या शेतामध्ये धान कापणी सुरू असताना 9 आणि 10 सप्टेंबरच्या रात्री त्यांच्याकडील तब्बल 6 एकरामधील हत्तीनी धान पूर्णतः नष्ट केल्याने त्यांच्यावर आर्थिक डोंगर कोसळून त्यांचा कुटुंबाचा गाडा कसा चालवणार या चिंतेत सापडले आहे ..
त्यांच्यासह बाजीराव वट्टी, दयाराम वट्टी,देवराव मडावी , शिलाताई मडावी,अनिल मेश्राम,
शालिक पात्रिकर या शेतकऱ्यांच्या शेतातील खूप मोठ्या प्रमाणात शेतातील धानाची नुकसान केलेली आहे .या चिंचेत शेतकरी सापडला असल्यामुळे वनविभागाने हत्तींच्या कळपाने धान पिकाची नुकसान झालेला शेतकऱ्याच्या शेतातील पंचनामे करून त्यांना भरीव भरपाई आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी या शेतकऱ्याकडून होत आहे..