तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ७ नोव्हेंबर ला आरमोरी तहसील कार्यालयावर मोर्चा

 

शेतकऱी व नागरीकांच्या विविध मागण्यांकडे वेधणार प्रशासनाचे लक्ष

 

आरमोरी – गडचिरोली जिल्हयातील आरमोरी तालुका हा प्रगतशील तालुका असला तरी तालुक्यातील शेतकरी नागरिक, भूमिहीन, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिक विविध समस्यांशी त्रस्त असुन त्यांचे तात्काळ निराकारण करण्यात यावे, या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ ला दुपारी ठीक १२ वाजता राममंदिर ते आरमोरी तहसिल कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे

यातील प्रमुख मागण्यामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे भारनियमन बंद करुण ८ तासावरुण १६ तास विद्युत पुरवठा करण्यात यावे. डोंगरगाव ठाणेगाव उपसा सिंचन योजनेतील शेतकऱ्यांच्या शेत व पिकांची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावे. तालुक्यातील सर्व आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे.

आरमोरी शहरातील इंदिरा नगर, बडी,ईदिरा नगर डोंगरी पालोरा रामारा काळागोटा इत्यादी हद्दवाढ झालेल्या जमिनीच्या आखीव पत्रिका भोगवट दाराच्या नावे देण्यात यावे .पिएम किसान योजनेतील प्रलंबित शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावे. तालुक्यात सरसकट तात्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावे. सर्व प्रकारच्या पिक विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांना देण्यात यावे. जंगली जनावरांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी विशेष पिकविमा लागु करावा.घरगुती वापरातील गॅस डिझेल व पेट्रोल च्या वाढलेल्या किमती कमी करण्यात यावे.नैराश्यात अडकलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी तातडीने मोठ्या प्रमाणात नोकर भरती करावी.अन्यथा सुशिक्षित बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता लागू करण्यात यावे. राज्यातील जनतेची जातीनिहाय जनगणना करुन सर्व प्रकारच्या मागासवर्गीयांना आरक्षण लागू करावे. कृषी पंपाचे अवाच्या सव्वा भरमसाठ बिले माफ करण्यात यावे. व रिडिंग करुन बिले देण्यात यावे कृषी पंपासाठी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विज कनेक्शन देण्यात यावे. जंगल व्याप्त परिसरातील शेतकऱ्यांना संरक्षणासाठी चेनलिग फॅन्सीगची व्यवस्था करण्यात यावे घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात यावे यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.

या मोर्चाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी मोचात उपस्थित राहुन मागदर्शन करणार आहेत.

तरी आरमोरी तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील शेतकरी शेतमजूर महिला युवक सुशिक्षित बेरोजगार व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने मोर्चात उपस्थित राहावे असे आवाहन आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी केले आहे.