भर रस्त्यावर तलवारीने केक कापणा­ऱ्या तरुणांना आरमोरी पोलीसांनी केले जेरबंद 

 

आरमोरी…. शहरातील रामाळा कडे जाणाऱ्या मार्गावर शनिवारी रात्रौ काही तरुण एकत्र येऊन व गोंगाट घालुन आरडा ओरड करून गाडीच्या सिटवर केक ठेऊन तलवारीने केक कापणाऱ्या पाच आरोपी विरुध्द आरमोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.यातील चार आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले आहे . तर यातील एक आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्हयातील सर्व शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नेहमीच गस्त केल्या जाते. रात्रीच्या वेळी देखील नागरीकांच्या सुरक्षीततेकरीता पोलीस दलाकडुन रात्रगस्त केल्या जाते. गडचिरोली पोलीस दलाकडुन आरमोरी शहरातील रामाळा जाणा­या मार्गावर दि.२५ नोव्हेंबर ला रात्रौ ११.३० ते १२..३० वाजताच्या दरम्यान काही तरुण एकत्र येवुन गोंधळ..आरडा ओरड करत असतांना दिसुन आल्याने त्याच्या जवळ जावुन पोलीसांनी चौकशी केली असता गाडीच्या सीट वर केक ठेवुन अवैधरित्या तलवार बाळगुन केक कापत असतांना तसेच गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडुन आणन्याचे उद्देशाने तलवार सहित मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही मध्ये १)एक धार धार टोकदार तलवार २)एक जुनी वापरती पांढ­या रंगाची अॅक्टीवा ६ जी गाडी नंबर एम. एच. ३३ ए.ए. १३४० ,३) एक जुनी वापरती काळया रंगाची सुपर स्प्लेडंर प्लस वाहन क्र एम.एच ३३ वाय ७८५४ मोटार सायकल असा एकुण अंदाजे ९६५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर गुन्हयातील आरोपी १) लोकेश विनोद बोटकावार वय २१ वर्ष, २) लोकमित्र खुशाल ठाकरे वय २५ वर्ष, ३) बादल राजेंद्र भोयर वय २३ वर्ष, ४) पवन मनोहर ठाकरे, वय २५ वर्षे व फरार आरोपी नामे राहुल मनोहर नागापुरे वय २८ वर्षे सर्व रा. बाजारटोली आरमोरी येथील असुन नमुद आरोपीतांच्या विरुध्द कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा १९५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सदर गुन्हयातील फरार आरोपीचे शोध घेणे सुरु असुन गुन्ह्राचा पुढील तपास मा. वरीष्ठचे मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरी येथील परि.पोउपनि संतोष कडाळे हे करीत आहेत.

 

 

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. एम. रमेश सा. व उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. मयुर भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरी प्रभारी अधिकारी पोनि. संदिप मंडलीक व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.