गुलाबी थंडीत चढला आरमोरीत प्रकाश चषक रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचा ज्वर!…

…. क्रिकेट म्हटला तर तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. क्रिकेट हा सर्वांच्या अतिशय आवडीचाव जिव्हाळ्याचा विषय असून लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वानाच क्रिकेटचे वेड लागलेले आहे. त्यामूळे येन गुलाबी थंडीत आरमोरीत सुरु असलेल्या प्रकाश चषक रात्रकालीन क्रिकेट स्पर्धाना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून क्रिकेट पाहण्यासाठी व क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी रात्रौ आरमोरीकराची दिवसेंदिवस गर्दी वाढतच आहे .आकर्षक विद्युत रोषणाईच्या झगमगाटात सुरु असलेल्या प्रकाश चषक रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा जणु आरमोरीकरासाठी पर्वणीच ठरत असुन गेल्या आठ दिवसापासून आरमोरीला क्रीडा नगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

 

 

आरमोरी येथील हितकारिणी महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलाच्या प्रांगणात २२ नोव्हेंबर पासुन प्रकाश चषक रात्रकालीन टेनिस बाल क्रिकेट स्पर्धा सुरु झाल्या. युवामंच व प्रकाश चषक आयोजन समितीच्या वतीने मागिल वर्षापासुन रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येत आहेत. आकर्षक विद्युत रोषणाईच्या नेत्रदीपक लाईटमध्ये या स्पर्धा सुरु असून हित्करिणी शाळेचे पटांगण लोकांच्या गर्दीने फुलून जात आहे. त्यामुळे क्रीडा संकुलाला स्टेडियमचे रूप आले आहे.

 

आरमोरीला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्राबरोबरच क्रिडा संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. आरमोरी शहरात गेल्या अनेक वर्षापासून विवीध प्रकारच्या क्रिडा स्पर्धा भरविण्यात येतात. स्पर्धेत खेळणाऱ्या अनेक खेळाडूंनी राज्यस्तरावर खेळून आपले नाव सुद्धा चमकविले आहे . त्यामुळे आरमोरी शहराचे नाव जिल्ह्यात क्रिडा नगरी असे घेतले गेल्यास वावगे ठरणार नाही.

 

गडचिरोली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मात्तबर नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या नावाने प्रकाश चषक रात्र कालीन क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रकाश सावकार पोरेड्डीवार हे क्रिकेटचे दर्दी असून त्यांनी आजपर्यंत जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देऊन पुढे नेण्याचे काम केले. जिल्हयातील खेळाडू हा चमकला पाहिजे . राज्य व देशपातळीवर खेळला पाहिजे यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यांनीं आजपर्यंत शेकडो विवीध क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम ते करीत आहेत. बऱ्याचदा ते स्वतः खेळाच्या मैदानात उतरून खेळाडू सोबत खेळून त्यांचा उत्साह सुद्धा वाढवीत असतात.

 

प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचा युवावर्ग मोठा चाहता असून आरमोरी व जिल्ह्यातील युवकांमध्ये त्यांची क्रेझ आहे. प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेली शेकडो युवा, तरुण कार्यकर्त्याची फळी आरमोरीत कार्यरत आहे.त्यामूळे युवामंच सामाजिक संघटना व प्रकाश चषक आयोजन समितीच्या वतीने मागिल वर्षापासुन रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा आयोजीत केल्या जात आहेत. ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूच्या क्रीडा कौशल्याना वाव मिळावा हा एकमेव उद्देश यामागे आहे.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मागिल एक दिड महिन्यापासून युवामंच व आयोजन समितीचे कार्यकर्ते राबत आहेत.

 

आरमोरी येथील हितकारीणी विद्यालयाचे पटांगण स्टेडियम सारखे सजविण्यात आले आहे. सभोवताल आकर्षक विद्युत रोषणई ,, २० बाय १० फुट व आठ बाय दहा फुटाच्या एलइडी स्क्रीन वरून मॅचचे लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे.

 

२२ नोव्हेंबरला सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात प्रकाश चषक रात्र कालीन क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार आ. कृष्णा गजबे, प्रा. डॉ सचिन खोब्रागडे, नगराध्यक्ष पवन नारनवरे, पोलिस निरीक्षक संदिप मंडलिक यांच्या उपस्थितीत प्रकाश चषक रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार सोहळा पार पडला. गेल्या आठ दिवसांपासून विवीध जिल्ह्यातील ५६ क्रिकेट टीम मॅच खेळण्यासाठी येतं असल्याने आरमोरी व जिल्हयातील क्रिकेट प्रेमी मॅच चा रोमांचक अनुभव घेत आहेत. विजेत्या टीमसाठी लाखोंची बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. भविष्यात जिल्हयाच्या इतिहासात प्रकाश चषकाचे नाव सुवर्ण अक्षराने कोरले जाईल हे मात्र निश्चित.

 

मार्निग सी .सी.क्रिकेट क्लबचे सदस्य स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. युवामंच, व प्रकाश चषक आयोजन समितीचे प्रमुख पदाधिकारी पवन नारनवरे, पंकज खरवडे, विलास पारधी, भारत बावनथडे ,सागर मने ,नंदु नाकतोडे अक्षय हेमके, गोविंदा भोयर, यांच्या नियोजनात क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या सूरू आहेत.