बेडगाव महिला सशक्तिकरण शिबिरात आमदार कृष्णा गजभे यांच्या हस्ते महिलेला ट्रॅक्टरचे वितरण

 

शिबिरात विविध साहीत्यासह महिला लाभार्थ्यांना रोख धनादेशाचे व प्रमानपत्राचे वितरण

कोरची
तालुक्यातील बेडगाव येथील महिला सशक्तीकरण शिबिरात आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते महिला लाभार्थीला ट्रॅक्टर तर अन्य महिलांना रोख धनादेश आणि विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. केंद्र सरकार व राज्य शासनाने महिला सक्षमीकरण करिता विविध प्रकारच्या योजना जाहीर केलेल्या असून सदर योजनांची माहिती एकाच छताखाली मिळावी व त्याची अंमलबजावणी ग्रामिण पातळीवर व्हावी यासाठी राज्य शासनाने अभियान राबविण्यात येत असून शासनाच्या सर्व योजनांची माहिती स्वतः आमदारांनी उदघाटक प्रसंगी भाषणांत २३ डिसेंबर रोजी शनिवारी बेडगाव येथे दिली. बेडगाव शिबिरात आठ ग्रामपंचायती अंतर्गत ३२ गावातील महिला लाभार्थ्यांना विभागामार्फत विविध योजनांचा लाभ दिला. त्यामध्ये जांभळी, बेडगाव, टेंमली, दवंडी, सातपुती, बेलगाव घाट, नवरगाव कोचिनारा या आठ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
या शिबिराचे उद्धाटन आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते झाले तर अध्यक्ष माजी सभापती श्रीमती शालिनीताई आंदे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच चेतन किसान, कोरची तहसीलदार प्रशांत गड्डम, बेडगाव पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी, कोरची तालुका भाजप अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष नसरुद्दीन भामानी, भाजप नेते आनंद चौबे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण जाधव, नगरसेवक घनश्याम अग्रवाल, श्रीमती सोनकुसरे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरची तालुका कृषी कार्यालय यांच्याकडून आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत निजाबाई दुर्गाराम देवांगन यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. पंचायत समिती गट साधन केंद्र येथून क शिक्षा दिव्यंग विद्यार्थी योजना अंतर्गत कु. दुष्यंत पुरुषोत्तम सहाडा या विद्यार्थ्याला ट्राय सायकलचे वाटप करण्यात आले. को-ऑपरेटिव बँक यांचेकडून समृद्धी स्वयं सहायता समूह भुऱ्यालदंड यांना एक लाखाचा कर्ज, बेडगाव येथील महिला बचत गटाला उमेद शाश्वत उपजीवेकडून ५० हजार, मोहगाव बचत गट यांना ७० हजार धनादेश, भीमपूर येथील दोन बचत गटांना २० हजार आणि ६० हजार CIF निधी, महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियान उमेद कडून व्यवसाय करिता गौरी स्वयंसहायता समूह यांना दीड लेखाचे कर्ज, मोहगाव संजना स्वय सहायता समूह, कोसमी यांना दीड लाख यांना कोरची विदर्भ ग्रामीण बँक मंजूर करून चेक, बँक ऑफ इंडिया कडून जय सेवा समूह बोडेना यांना एक लाख, लक्ष्मी समूह गुटेकसा यांना दोन लाख, भीमपूर शक्ती समूह यांना अडीच लाख, काळे सरस्वती समूह यांना ५० हजार, बेलगाव घाट भीम ज्योत समूह यांना तीन लाख, जांभळी महालक्ष्मी समूह यांना दोन लाख धनादेशांचे वितरण करण्यात आले.
प्रधानमंत्री उज्वला एक गॅस कनेक्शन, एकात्मिक बाल विकास कार्यालयाकडून चार महिला लाभार्थ्यांना बेबी किट, तहसील कार्यालयाकडून २७ जातीचे प्रमाणपत्र, ३८ उत्पन्नाचे प्रमाणपत्र, १५ अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत वीस हजारचे चार महिलांना लाभ, पुरवठा विभागाकडून सहा लाभार्थ्यांना दुय्यम शिधापत्रिका, आरोग्य विभागाकडून विविध प्रकारच्या ३५० आरोग्य तपासणी तसेच १८७ गोल्डन कार्ड, ६९ सिकलसेल कार्ड, ५७ लाभार्थ्याची डोळे तपासणी, १५७ NCD तपासणी, १० प्रसूतीमाता JSY लाभ, सेतू केंद्राकडून नवीन ३२ आधार कार्ड नोंदणी, २७ जॉब कार्ड, चार ग्रामपंचायतकडून विविध ६५ दाखले, महिला व बालकल्याण विभागाकडून पाच लाभार्थ्यांना बेबी केअर किट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद यांच्याकडून पाच लाभार्थ्यांना शिधा किट व ब्लॅंकेट, पंचायत समितीकडून सात लाभार्थ्यांना शबरी आवास योजने अंतर्गत दोन लाभार्थींना मोदी आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले.
दरम्यान आमदार कृष्णा गजबे यांना यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदारांनी सांगीतले की, महाराष्ट्र राज्यातून पाच आमदारांनाच सदर पुरस्कार मिळाले असून आतापर्यंत दहा टर्न झालेली आमदार आणि मंत्र्याना सुद्धा हे पुरस्कार अजुन पर्यंत मिळाले नाही परंतु मला हे पुरस्कार माझ्या क्षेत्रातील जनतेमुळे असुन हे पुरस्कार माझ्या जनतेचे असल्याचे सांगीतले आहें. यावेळी बेडगाव परिसरातील मोठ्या संखेने महिला उपस्थित होते.