आरमोरीत ४ जानेवारीला “क्रांती निळ्या पाखराची, प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

 

आरमोरी….

समता युवा सामाजिक संघटना आरमोरीच्या वतीने भिमा कोरेगांव शौर्य दिन अभिवादन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती समारोह निमीत्य दिनांक ४ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता विजय पारधी यांचा “क्रांती निळ्या पाखराची, हा प्रबोधनपर संगीतमय कार्यक्रम आरमोरी जूना बसस्थानक जवळील तथागत बुद्ध विहाराच्या परिवर्तन मंच सभागृहात होणारं आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामीण विकास शिक्षण संस्था चुरमुराचे संस्थापक डॉ. राजकुमार शेंडे यांच्या हस्ते होणारं आहे. सहउद्घाटक म्हणुन किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरीचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे हे राहणार आहेत तर अध्यक्षस्थानी प्रेरणा शिक्षण. संस्था आरमोरीचे सचिव मदन मेश्राम हे राहणार आहेत.
प्रमूख अतिथी म्हणून भिवापूरचे तहसिलदार कल्याणकुमार डहाट, आरमोरीचे तहसीलदार, श्रीहरी माने, अहेरीचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे , आरमोरीचे पोलीस निरीक्षक संदिप मंडलिक, डॉ आंबेडकर स्मारक मंडळाचे अध्यक्ष यशवंत जांभुळकर , सामाजिक कार्यकर्ते जयकुमार मेश्राम, नगराध्यक्ष . पवन नारनवरे, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी, अविनाश मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ठवरे, प्रा. शशिकांत गेडाम, माजी जि.प.सभापती वेणुताई ढवगाये, माजी जिल्हा परिषद सदस्य मनिषा दोनाडकर, तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम,योगेंद्र बन्सोड, नगरपरिषद उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी, नगरपरिषद सभापती भारत बावणथडे, विलास पारधी, सागर मने, सुनिता चांदेवार नायब तहसिलदार ललीतकुमार लाडे, प्राचार्य रविंद्र बांबोळे, प्राचार्य जयदास फुलझेले , प्राचार्य साईनाथ अद्दलवार, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, धानोराचे सहाय्यक गटविकास अधिकारी एम. ई. कोमलवार,. माजी प्राचार्य पि.के. सहारे , विनोद शेंडे , श्री सत्यसाई आदीवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था आरमोरीचे सचिव महेश तितीरमारे , शाखा अभियंता प्रविण झापे, गट समन्वयक कैलाश टेंभुर्णे, मोरेश्वर टेंभुर्णे, खिरेंद्र बांबोळे डॉ. प्रदिप खोब्रागडे, मनोज टेंभुर्णे, कलिराम गायकवाड, अभियंता अविनाश बंडावार डॉ. अमोल धान्नक, डॉ. सोनाली धान्नक, प्रा. सौ स्नेहा श्रीकांत गौतम, राजु उके अविनाश चंहादे, अमर बोबाटे, गोलू वाघरे, गंगाधर कुकडकर, शुभम हुकरे, जितु शेंडे, राजु कुंभारे, प्रफुल ठवकर, सत्यवान वाघाडे, सिध्दार्थ साखरे, विजय लाकडे, अतुल मेश्राम, शुभम तुमने आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समता युवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश अंबादे यानी केले आहे.