श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरीच्या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट निकाल  

 

आरमोरीच्या नर्सिंग कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम – श्री सुधाकर साळवे, संचालक    

आरमोरी,

स्थानिक श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग, आरमोरीच्या जनरल नर्सिंग एंड मीडवायफरी प्रथम वर्षाचा निकाल महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ, मुंबई यांनी २० फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केला. यात महाविद्यालयाचा ८७ टक्के निकाल लागला. प्रथम श्रेणीमध्ये १० विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यामध्ये प्रथम क्रमांक आचल शंकर मंडलवार आणि स्वाती संतोष सेलोटे यांनी संयुक्तपणे पहिल्या डीव्हीजनमध्ये ३८७ गुण प्राप्त केले. द्वितीय क्रमांक लीना रामचंद्र ठाकरे ३७६ गुण तर तृतीय क्रमांक निशिगंधा देवानंद औतकर ३७४ गुण यांनी मिळविला. महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश निश्चितच अभिमानास्पद आहे, याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

यावेळी श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग, आरमोरीचे संचालक श्री. सुधाकरजी साळवे यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असे सांगून अतिदुर्गम, दुर्गम भागातील मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयातून नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अनेक विद्यार्थी आज देशभरात कर्तव्य बजावत आहेत. महाविद्यालयाच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थी स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवीत आहेत, असा संदेश देत विद्यार्थ्यांनी अपयशातून खचून न जाता जिद्द व अभ्यासात सातत्य ठेवले तर यश निश्चित मिळते असे प्रतिपादन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग, आरमोरीचे संचालक श्री. सुधाकरजी साळवे, प्राचार्या कु. पूनम नारनवरे, संगम मेश्राम, पल्लवी कोथळकर, चंदू दुमाने, करिष्मा हांडे, भाग्यश्री मेश्राम आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना श्रेय देऊन वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार मानले.