*संताजी महाविद्यालय आरमोरी येथे कौशल्य विकास केंद्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

. आरमोरी

तालुका प्रतिनिधी:- दि 13/3/2024 – श्रीमती अंबाबाई खोब्रागडे शिक्षण सेवा प्रसारक मंडळ आरमोरी जिल्हा गडचिरोली यांच्या द्वारा संचालित श्री संताजी महाविद्यालय आरमोरी येथे आज दिनांक 13 मार्च 2024 रोजी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे दूरदृषय प्रणालीद्वारे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटनिय सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून श्री अंबाबाई शिक्षण सेवा मंडळाचे सचिव तथा श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालय वैरागड येथील प्राचार्य डॉ सचिन भाऊ खोब्रागडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आरमोरी येथील पंचायत समितीचे सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी श्री अशोक कुर्जेकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री धर्मेंद्र जनबंधु प्रा विवेक हलमारे ,प्रा अमरदीप मेश्राम, प्रा दौलत धोटे, प्रा विशाल रंगारी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते कौशल्य विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनिय सोहळ्याच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना डॉ सचिन भाऊ खोब्रागडे म्हणाले आधुनिक युगात निवड पारंपारिक शिक्षण घेऊन जमणार नाही कारण जग हे मोठ्या वेगाने प्रगती करत असून या स्पर्धेच्या युगात आपल्या विद्यार्थ्यांना जर टिकायचे असेल तर त्यांनी कोणताही कौशल्याचा अभ्यासक्रम शिकून आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे आणि कौशल्य विकास प्रशिक्षण या माध्यमातून त्यांनी आपली तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती करून घ्यावी या कौशल्याच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी संपूर्ण देशभरात नव्हे तर जगात मिळणार आहे त्यामुळे त्यांनी या गोष्टीसाठी आवर्जून आपापली नोंदणी करावी आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधावी असेही मार्गदर्शन त्यांनी केले सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी श्री अशोक कुर्जेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले मुलींनी निवड साधा शिक्षण घेऊन चालणार नाही तर त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय शिक्षण घेणे अतिशय गरजेचे आहे आणि या व्यवसाय शिक्षणाची खरी नांदी ही कौशल्य विकास शिक्षणातून निर्माण होण्याची संधी तुम्हाला लाभली असल्याने या कौशल्य विकासाचा आपण लाभ घ्यावा आणि आपली प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा विवेक हलमारे संचालन प्राचार्य फाल्गुन नरुले यांनी केले तर आभार प्रा सचिन खेडकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा सचिन खेडकर प्रा विशाल रंगारी ,शरद समर्थ प्रा तुपट प्राध्यापक दोनाडकर, प्राध्यापिका कुमारी चौधरी मॅडम, प्राध्यापिका कुमारी मैद , प्राध्यापिका गणविर मॅडम ,महाविद्यालयातील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले