आरमोरी : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे १६ ते १८ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या पाचव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी आरमोरी शहरातील यशवंत इंग्लिश मिडीयम स्कुल च्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनअंतर्गत गडचिरोली जिल्हा स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा क्रीडा प्रबोधिनी गडचिरोली येथे विविध वयोगटातील नुकतीच घेण्यात आली. यात व्याहाड (खुर्द), आरमोरी, नवेगाव व गडचिरोली येथील २३ विध्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा १० ते १४, १४ ते १८, १८ ते २८, २८ ते ३५, ३५ ते ४५, वयोगटात पारंपारिक आर्टिस्टिक आणि पारंपारिक योग या प्रकारात घेण्यात आली. यात यशवंत इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विध्यार्थ्यांनी अत्युत्तम कौशल्य आणि समर्पण दर्शवून १६ ते १८ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या संगमनेर जि. अहमदनगर येथील पाचव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यानुसार १४ ते १८ वयोगटातील पारंपारिक योग प्रकारात इयत्ता नववीची मानसी निवृत्ती सोनटक्के, इयत्ता दहावीची प्राची पितांबर राऊत यांनी यश संपादन केले व राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी भरारी घेतली. या यशस्वी कामगिरीसाठी यशवंत इंग्लिश मिडीयम स्कुल चे योग शिक्षक धनराज कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
15 ऑगस्ट रोजी आयोजित विविध कार्यक्रमादरम्यान श्री. संताजी समाज सेवा प्रतिष्ठान आरमोरी चे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे व संस्था सचिव डॉ. सचिनभाऊ खोब्रागडे आणि संस्था सदस्य डॉ. सुशीलभाऊ खोब्रागडे यांच्या हस्ते त्यांचे सत्कार करण्यात आले त्यांच्या यशासाठी व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागासाठी शुभेच्छा दिल्या. हे यश त्यांच्या मेहनतीचे आणि शाळेचे प्राचार्य अमरदीप मेश्राम व समस्त प्राध्यापक वर्ग व प्राध्यापिका वर्ग यांच्या उत्कृष्ठ मार्गदर्शनाचे प्रमाण असल्याची प्रतिक्रिया दर्शविली. शाळेचे प्राचार्य तथा समस्त प्राध्यापक व प्राध्यापिका वर्गानी सुद्धा त्याच्या यशासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.