कोजबी ग्रामपंचायत प्रशासन विरोधात सहाव्या दिवशीही साखळी आंदोलन सुरूच.

 

ठाणेदारांनी घेतली आंदोलकांची भेट

– आरमोरी तालुक्यातील कोजबी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सोनपूर येथील आबादी जागेवरती बाहेरगावातील व्यक्ती तसेच गावातील जागेची गरज नसलेल्या व्यक्ती यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने सोनपूर येथील 14 एकर आबादी जागेपैकी एकही जागा शिल्लक नसल्याने सोनपूर येथील ग्रामसभेने याबाबत वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी पत्र व्यवहार करून जागा अतिक्रमण मुक्त करण्यासाठी तसेच समितीने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायत प्रशासनाने गावाच्या विरोधात रेकॉर्ड नसलेल्या व्यक्तींना नमुना आठ देण्याचा ठराव पारित केला होता तो रद्द करणे सुरू असलेल्या अवैध घर बांधकाम बंद पडून जागा मोकळी करून देणे बाहेर गावातील व्यक्तींचे सोनपूर येथे रस्त्यालगत असलेले खताचे खड्डे तात्काळ हटविणे पिण्याचे पाणी सुरळीत करून पाणी टंचाईवर उपाययोजना करणे पेसा समितीचा निधी नियोजनानुसार तात्काळ खर्ची घालने याविषयी दिनांक 6 जून 2024 रोजी ग्रामपंचायत प्रशासना विरोधात सोनपूर येथील संपूर्ण गावकऱ्यांनी साखळी आंदोलन केले होते त्या आंदोलनाची दखल घेत पंचायत समिती आरमोरीचे सहाय्यक गट विकास अधिकारी कुर्जेकर यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली व ग्रामपंचायत प्रशासनाला तसे निर्देश दिले त्यावरून ग्रामपंचायत कोजबीच्या सरपंच, सचिव यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या समक्ष आंदोलकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे सांगितले व तसे ग्राम पंचायत प्रशासनाने सरपंच सचिव यांच्या स्वाक्षरीनिशी हमीपत्र देऊन एक महिना सात दिवसाचे आत सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे तोंडी आश्वासन दिले परंतु चार महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा एकही मागणी पूर्ण न झाल्याने दिनांक 20 सप्टेंबर 2024 पासून सोनपूर येथील सर्व ग्रामसभा यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत साखळी आंदोलन सुरू केले आहे. आज दिनांक 25- 9- 2024 रोजी आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलाश गवते यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली व अतिक्रमण असलेल्या मोक्यावर जाऊन पाहणी करून आंदोलकांच्या मागण्या ह्या रास्त असल्याचे सांगितले व याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना करून सदर प्रकरण तात्काळ मार्गी लागण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी गोपनीय शाखेचे हवालदार अशोक ठाकरे ग्रामपंचायत सदस्य मनोहर मोरांडे ग्रामपंचायत सदस्य शशिकला कुमरे ग्रामपंचायत सदस्य कविता पाटील माधुरी सहारे पेसा समिती अध्यक्ष सुरेश तूमरेटी समितीचे सदस्य दर्शना वाकडे रामदास डोंगरवार रसिका कुमरे देवराव चूधरी पुंडलिक सिडाम रवींद्र डोंगरवार गीताबाई मडावी वैशाली डोंगरवार सुमित्रा बावणे शांता ठाकूर सीता डोंगरवार ज्ञानेश्वर शेंडे रामदास गावडे विश्वनाथ तूमरेटी गोपाल बावणे अविनाश सीडाम रमेश डोंगरवार लोमेश वाकडे श्रीरंग ठाकूर रामदास रणदिवे संदीप कुमरे अशोक डोंगरवार अरुण डोंगरवार अरुण मडावी दशरथ डोंगरवार आदी ग्रामस्थ आंदोलन स्थळी उपस्थित होते