आदिवासी समाजाच्या इतर समस्या सोबत प्रकृतीची केली विचारणा…..
आदिवासी समाज आजही मोठ्या प्रमाणावर मागास आहे त्यामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गातून इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देऊ नये या मागणीसाठी डॉ शिलू चिमुरकर या गेली सात दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. डॉक्टर शिलू चिमूरकर यांच्या प्रकृतीत बिघाड आल्याची माहिती मिळताच आज उपोषण स्थळी त्यांना भेटून डॉ. आशिष कोरेटी यांनी उपोषणकर्त्या डॉक्टर शिलु चिमूरकर यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर चर्चा केली. डॉ. शीलू चिमूरकर यांची मुळातच प्रकृतीत बिघाड व उपोषणामुळे शारीरिक कमजोरी आली असल्याने प्रशासनाने त्वरित त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी अशी ही मागणी डॉ. आशिष कोरेटी यांनी केली.
पुढे चर्चा करताना डॉ. आशिष कोरेटी यांनी आदिवासी समाज हा अजूनही मोठया प्रमाणावर मागास आहे,
शिक्षण, आरोग्य, शेतकरी, युवक व महिला सक्षमीकरण या विषयात समाजाला आजही प्रगती करण्याची गरज आहे.
आदिवासी समाजात अजूनही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात मोठे काम होणे गरजेचे आहे. या समस्या तर समाजात आहेतच परंतु इतरही अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. समाजात अनेक समस्या असतांना सरकारचे लक्ष कुठे आहे, महायुती सरकार फक्त मोठे इव्हेंट करण्यात व्यस्त आहे. फसव्या योजना राबविण्यात यशस्वी होत आहे. परंतु समाजाच्या प्रश्नाकडे या सरकारचे अजिबात लक्ष नाही. अशा विविध समस्या वर चर्चा करून डॉ चिमुरकर यांच्या उपोषणाला एक शिक्षित व समाज हितकारक युवक म्हणून डॉ कोरेटी यांनी पाठिंबा दिला.
आपणही गडचिरोली जिल्ह्यातील व आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी समाज बांधवांसाठी सर्वांगीण विकास व्हावा व सर्व समाजाला योग्य न्याय मिळावा यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील, असे आश्वासन सुद्धा डॉ आशिष कोरेटी यांनी दिले.