तेली समाज मेळावा; गुण गौरव सोहळा
आरमोरी: आजच्या या आधुनिक युगात समाज व कुटुंब विखुरले जात असून त्याचा परिणाम नवीन पिढीवर होत आहे. परंतु अशा मेळाव्याच्या माध्यमातून विचारांची व विवाह जुळण्याच्या संबंधांची आदान प्रदान होते आणि संवाद साधता येतो , त्यामुळे अशा प्रकारचे परिचय , व्याख्यान, गुणगौरव मेळावे आयोजित करणे आवश्यक असून समाजाने अशा मेळाव्यांमधून एकत्र येत संवाद साधावा असे आवाहन तेली समाजाचे नेते, किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे यांनी उपस्थित समाज बांधवांना केले. तेली समाज मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. आरमोरी येथे श्री संताजी जगनाडे महाराज पुणयतिथी निमित्ताने रविवारी झालेल्या तेली समाज मेळावा सपंन झाले यामध्ये ज्येष्ठ नागरिक व प्रतिष्ठित व्यावसायिक सत्कार, सेवा निवृत्त कर्मचारी, प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व वर वधू परिचय मेळावा आरमोरी येथे संताजी ग्राउंड येथे करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक योगिता पिपरे माजी नगराध्यक्ष न. प. गडचिरोली, तर कार्यक्रम चे अध्यक्ष म्हणून किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरी चे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे हे होते तर ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा चे अध्यक्ष बबनराव फंड हे होते तर प्रमूख उपस्थिती म्हणून प्रभाकर वासेकर अध्यक्ष प्रांतिक तेली समाज, प्रमोद पीपरे जिल्हाध्यक्ष प्रांतिक तैलिक गडचिरोली, परसराम टिकले माजी सभापती प.स. आरमोरी, तेली समाज अध्यक्ष बुधाजि कीरमे, संजय येरणे सामजिक वक्ते, भास्कर बोडणे उपसरपंच वैरागड, मुखरुजी खोब्रागडे तेली समाज अध्यक्ष वैरागड, पुंडलिक जुवारे, नेताजी बोडने, भाग्यलक्ष्मी खोब्रागडे, हे उपस्थीत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद खोब्रागडे, संचालन प्राध्यापक प्रदीप चापले आभार प्रदर्शन गंगाधर जूवारे यांनी केले यावेळी श्री संताजी बहुद्देशीय सेवा मंडळ चे उपाध्यक्ष रामभाऊ कुर्जेकर सचिव देविदास नैताम, सहसचिव तुळशीरामजी चिलबुले, विवेक घाटूरकर,शंकरराव बावनकर गंगाधर, गजानन चीलंगे, रवींद्र सोमणकर, विलास चिलबुले, रवींद्र निंबेकर प्रतिभा जुवारे , आकाश चिलबुले,हिराबाई कांबडी, सदाशिव भांडेकर, रोहित बावनकर आदींनी कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य लाभला.