आरमोरी… श्री साई स्कुल ऑफ नर्सिंग आरमोरी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली
यानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रम घेण्यात आले.
सावित्रीबाई फुले जयंती निमित ३ जानेवारी हा दिवस भारतात शिक्षणाच्या क्षेत्रात आणि सामाजिक सुधारणांसाठी महत्त्वाचा मानला जातो. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची १९४वी जयंती साजरी केली जात आहे. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. या दोघांनी १ जानेवारी, १८४८ रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती. तत्पूर्वी अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी १८२९ मध्ये मुंबईत मुलींची शाळा सुरु केली होती. १८४७ मध्ये, विद्यार्थी साहित्यिक आणि वैज्ञानिक समाजाने मुंबईच्या गिरगाव परिसरात मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल सुरु केले. पेरी चरण सरकार यांनी १८४७ मध्ये बारासात या बंगाली शहरात कालीकृष्ण गर्ल्स हायस्कूल नावाची मुलींसाठी शाळा सुरु केली. पारशी समुदाय मुंबईने १८४७ मध्ये मुलींसाठी एक शाळा देखील स्थापन केली होती
श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आणि मेडिकल सायन्स वाकडीचे अध्यक्ष व श्री साई स्कुल ऑफ नर्सिंग आरमोरी चे संचालक सुधाकार साळवे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून व दीप प्रज्वलित करून विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून नुसते शिकून ज्ञान प्राप्त करून समोर जाण्या पेक्ष्या सावित्रीबाई फुले सारखे सामाजिक कार्ये करा व शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमात मृणाल दर्वे , पल्लवी कोथळकर , कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी भूषण ठकार सर, संगम मेश्राम, चंदू दुमाने , करिष्मा हांडे , मोनाली सडमेक , समीर कांबळे , चंदा गुरनुले , अल्का मारभते, मोहिनी मारभते, वासुदेव फुलबांधे, सचिन हजारे उपस्थित होते.