लाखोंचा प्रसाधनगृह पण …….. धुण्यास आणि वापरन्यास पाणीच नाही.

आरमोरी शहरातील भगतसिंग चौक हे एक अनेक गावांना जोडणारे आणि व्यापारी दृष्टिकोनातून मुख्य चौक आहे या चौकात बाहेरून येणाऱ्यांची आणि गावातील लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते या सर्व लोकांची गैरसोय होता कामा नये म्हणून या जागेवर लाखो रुपयांचा खर्च करून प्रसाधन गृह बांधण्यात आले हे इमारत बांधकाम होऊन वर्ष लोटले असले तरी सध्या स्थितीत ही इमारत एक शोभेच्या वस्तू सारखीच असल्यागत होत आहे लाखो रुपये खर्च करून सुद्धा या सुलभ सौंचालयाला पाहिजे ती व्यवस्था केल्या गेली नाही येथे रंगरंगोटी व पाण्याच्या नळाची फिटिंग करून पाण्याच्या टाक्या मांडल्या गेल्या असल्या तरी पण त्या फक्त शोभेच्या वस्तूच बनले आहेत जवळच असलेल्या सार्वजनिक विहिरीतून पाईपलाईन लावल्या गेली परंतु अद्यापही त्या विहिरीवरील पाणी टाक्यात जाण्याकरिता मशीन बसविली गेली नाही त्यामुळे अनेकांना आपले नाक दाबून आत जावे लागते तर शौचालयाचा वापर करताना पाण्याअभावी मोठ्या अडचणी पार करावे लागत आहे मीटर लावल्या गेले असेल तरी अद्यापही रात्रीचा उजेळ मात्र झाला नाही फक्त बिल भरण्यापूर्तीच मीटर लावण्यात आले की काय अशी चर्चा सुद्धा लोक करायला लागले आहेत सदर प्रसाधनगृहाचा समोरचा परिसर हा सौंदर्यकरण न केल्याने किंवा त्याची योग्य पद्धतीने जोपासना न केल्याने अनेक लोक तिथे सायकल रिक्षा ठेवून असतात प्रसाधनगृहाचे दरवाजे सताड उघडे राहत असल्याने व या ठिकाणी सद्यस्थितीत कुणाचे नियंत्रण नसल्याने कुठेही लघवी सौंचास करण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे यामुळे लगतच्या व्यापाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे त्यांनी आपल्याकडे तोंडी तक्रारी सुद्धा केल्या आहेत.आपन वारंवार सूचना देउन सुद्धा नगर पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करित आहे.
नगरपालिका प्रशासनाने या इमारतीची चौकशी करून प्रसाधनगृहाची कायम निगा राखल्या जाईल यासाठी तात्काळ ठोस पावले उचलून लवकरात लवकर पाण्याची आणि लाईटची व्यवस्था करावी, त्याचप्रमाणे समोरचा परिसरही स्वच्छ आणि सौंदर्यीकरण करावे अशी मागणी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केलेली आहे.