श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी येथे ०८ मार्च २०२३ रोजी “जागतिक महिला दिवस” साजरा करण्यात आला . प्रमुख पाहुणे म्हणून श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी चे संचालक श्री. सुधाकरजी साळवे सर, सौ. रश्मी आखाडे लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिक गडचिरोली, भाग्यश्री गडपल्लिवार बाल विकास मंच जिल्हा संयोजिका , डॉ. गणेश जैन लोकमत कार्यालय प्रमुख गडचिरोली जिल्हा, चंदू वडपल्लिवार माजी अध्यक्ष राजीव गांधी निराधार योजना, महेंद्र रामटेके लोकमत तालुका प्रतिनिधि , डॉ. संगीता रेवतकर लोकमत सखी मंच तालुका संयोजिका, अर्चना ढोबडे लोकमत सखी मंच हे उपस्थित होते. व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गणेश जैन लोकमत कार्यालय प्रमुख गडचिरोली जिल्हा उपस्थित होते.
लोकमत कार्यालय प्रमुख गडचिरोली जिल्हा व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गणेश जैन यांच्या मते जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी समाजाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. महिला मोठ्या प्रमाणात सामाजिक असमानता, अत्याचार, आर्थिक परावलंबित्व आणि अन्य सामाजिक अत्याचारांना बळी पडतात. हे समजावून सांगितले.
या प्रसंगी श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी चे संचालक श्री. सुधाकरजी साळवे यांनी जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आज च्या युगातील महिला प्रत्येक क्षेत्रात आपली कामगिरी खूप चांगल्या प्रकारे करीत आहे, महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रती आदर व्यक्त करतात. या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते.
चंदू वडपल्लिवार माजी अध्यक्ष राजीव गांधी निराधार योजना यांच्या मते प्रत्येक स्त्री च आपल्या आयुष्यातील स्थान अतिशय महत्त्वाचे आहे, स्त्री ने केलेल्या प्रत्येक कार्याचा आम्हाला आदर आहे. अशा बऱ्याच गोष्टींची जाणीव स्त्री चा सन्मान करून दिली जाते.
तसेच सौ. रश्मी आखाडे लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिक गडचिरोली यांनी नर्सिग या क्षेत्रात सुद्धा महिलांनी ज्याप्रमाणात योगदान देत आहे. दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पार पाडत महिला समाजाच्या आधारस्तंभ बनल्या आहेत. कधी प्रेमळ कन्या, तर कधी वात्सल्यपूर्ण माता, तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत आहेत. हे समजावून सांगितले.
महेंद्र रामटेके लोकमत तालुका प्रतिनिधि यांच्या मते अनादी काळापासून महिलांवरील ही बंधने त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या आड येत आहेत. तसेच श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी च्या प्राचार्या कु. मनीषा बारापात्रे यांनी सुद्धा जागतिक महिला दिनीच्या निमित्याने मोलाचे मार्गदर्शन केले. समाजाने स्त्रियांकडे वाईट नजरेने बघण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. तसेच सर्वांनी आपल्या आई सोबतच सर्व महिलांचा सन्मान करावा असे आव्हान केले.
संचालन संकेत बुद्धेवार आणि आभार प्रदर्शन मेघा वासणीक यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक वृंद प्राचार्या कु. मनीषा बारापात्रे, कु. नेहा लाचरवार , कु. शिवानी भाणारे , कु. अश्विनी मडावी , कु. काजल बावणे , श्री. भूषण ठकार , श्री. स्वप्नील धात्रक , सुनिता हेडाऊ, पिंकी साळवे , वासुदेव फुलबांधे यांचे सहकार्य लाभले.