स्थानिक ठाणेगाव येथे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक शिक्षिका कुमारी साधना रतन कन्नाके यांचा समाजातील व कुटुंबातील योगदानासाठी व भविष्यातील वाटचाली करता पाठबळ मिळण्यासाठी शाळा सिद्धि बाह्य मूल्यमापनाच्या समितीवर प्रमुख म्हणून आलेले श्री राजेश वडपल्लीवार केंद्र प्रमुख शिरशी मोहझरी यांच्याकडून पुष्पगुच्छ व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला
जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्त्रीचे समाजातील अत्यंत महत्त्वाचे स्थान स्त्री हीच जगाचा उद्धार करू शकते एवढे सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे या स्वरूपाचे वक्तृत्व विद्यार्थ्याने केले याप्रसंगी विद्यालयातील सत्कारमूर्ती सहाय्यक शिक्षिका यांनी
आपले मनोगत व्यक्त केले ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीरपणे एक स्त्री उभी असते त्याचप्रमाणे ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले तसेच समाजातील प्रत्येक पुरुषाने खंबीरपणे महिलांना भविष्य कालीन प्रगती करिता त्यांच्या पाठीमागे उभे राहुन सहकार्य करावे महिला आर्थिक संस्था सुद्धा खूप सुंदरपणे सांभाळू शकते कारण आजपर्यंतच्या इतिहासात कर्ज बुडवण्यामध्ये एकही महिला नाही महिला हीच समाजाचा उद्धार करू शकते आजही झोपेतून उठण्यापासून तर झोपेपर्यंत प्रत्येक स्त्री कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी धडपडत असते त्यामुळे याची सुद्धा जाणीव समाजाने ठेवावी असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले
कार्यक्रमाला श्री राजेशजी वडपल्लीवार केंद्रप्रमुख शिरसी मोझरी श्री सुरेशजी मडावी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरगाव श्री घनश्याम मडावी जिल्हा परिषद शाळा नरचोली श्री विवेकानंद तिरंगम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरटोला श्री हेमंत कुमार बिसेन विषय साधन व्यक्ती गटसाधन केंद्र आरमोरी प्राचार्य प्रशांत झिमटे यशवंत कला उच्च माध्यमिक विद्यालय ठाणेगाव हे आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु श्रद्धा सहारे यांनी केले तर प्रास्ताविक कु टीना कांबळे व आभार कु तेजस्विनी राऊत हिने मानले कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते