जागतिक महिला दिनानिमीत्त वंचितने केले गरजू महिलांना सॅनिटायझर पॅडचे वाटप

आरमोरी
वंचित बहुजन महिला आघाडी तालुका शाखा आरमोरीच्या वतिने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरमोरी शहरातील गरजू व मोलमजूरी करणा-या महिलांना सॅनिटायझर पॅडचे वाटप करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकारी आरमोरी शहरातील काळागोटा वार्डात घरोघरी जाऊन प्रत्यक्ष सॅनिटायझर पॅडचे वाटप केले.
यावेळी डॉक्टर कल्याणी उंदीरवाडे यांनी महिलांना मासिक पाळी दरम्यान काळजी कशी घ्यायची या बद्दल जनजागृती करून माहिती दिली.
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका प्रज्ञा निमगडे, तालुका प्रभारी डॉ. कल्याणी उंदिरवाडे, सदस्य, संध्या रामटेके, पुष्पा रामटेके, तालुकाध्यक्ष राजेंद्र गेडाम, उपाध्यक्ष विकास भैसारे, ताराचंद बंसोड आदिंच्या नेतृत्वात सदर उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी शहरातील काळागोटा वार्डातील महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.