आरमोरी-आरमोरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना व युवासेनेच्या वतीने राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतिथीनुसार शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.आरमोरी येथे शिवजयंती प्रित्यर्थ भव्य शोभायात्रा काढण्यात आली.त्यामुळे’ जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण आरमोरी शहर दुमदुमले होते.
तत्पूर्वी आरमोरी येथील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिर येथे सर्व शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते तथा नागरिक एकत्र गोळा झाल्यानंतर युवासेनेचे जिल्हाध्यक्ष चंदू बेहरे, शिवसेनेचे जिल्हा संघटक राजू अंबानी,शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी सभापती चंद्रशेखर मने यांनी शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेला माल्यार्पण करून ,श्रीराम मंदिरापासून शोभयात्रेला सुरुवात करण्यात आली.ही शोभायात्रा आरमोरी येथील शिवाजी चौकात आल्यानंतर तेथील अर्धकृती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवभक्तांनी माल्यार्पण करून पूजा केली.
या शोभायात्रेत व मिरवणुकीत आरमोरीकरांना बघण्यासाठी विविध ऐतिहासिक झाक्यां काढण्यात आल्या.अश्वरूढ शिवाजी महाराज,अश्वरूढ झाशीची राणी लक्ष्मीबाई, संत तुकाराम -शिवाजी महाराज भेट, शिवपिंडीवर रक्त अर्पण करताना शिवाजी,शिवाजी महाराजांना तलवार देताना भवानी देवी, मराठा-मावळे यांच्या जिवंत झाक्या मिरवणुकीत दाखविण्यात आल्या. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या पुरुषांनी पिवळे वस्त्र व डोक्यावर भगवे फेटे परिधान केली होती, तर स्त्रियांनी पिवळी व भगवी वस्त्र परिधान केलेली होती, तसेच मराठी शाही भगवा फेटा लावून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक संस्कृतीचे दर्शन या मिरवणूकीने घडवून आणले . त्यामुळे सर्वत्र वातावरन भगवामय होऊन मिरवणुकीने डोळ्यांचे पारणे फेडले. “ जय भवानी जय शिवाजी ” च्या गजराने शिवरायांच्या गीताने व ब्यांड, डीजेच्या तालावर, शहरातील तरुणाई थिरकली होती. ढोल, ताशा, मृदंगाच्या गजरात तालुक्यातील अनेक शिवभक्त याशोभायात्रेत सहभागी झाले होते. दिंडी,मृदंग व टाळाचे ठेका धरत महाराजांच्या गाण्यावर आनंदाने नाचत होते. सदर मिरवणूक बघण्यासाठी आरमोरीकरांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती . या शोभायात्रेत विविध रंगी रोषणाई डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. सदर मिरवणूक संपूर्ण शहरात फिरून, समारोप स्थानिक श्रीराम मंदिर येथे करण्यातआला. शोभायात्रेत काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
तत्पूर्वी सकाळी १०.०० वाजता शिवजयंती सोहळ्याप्रित्यर्थ शिवसेना व युवासेनेच्या वतीने आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आला.यात एकूण २६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच शोभायात्रा निघणार म्हणून शिवभक्तांनी संपूर्ण आरमोरी शहरात ठिकठिकाणी भगव्या झेंड्या व भगवे तोरण बांधले.त्यामुळे संपूर्ण शहर भगवामय झाला होता.
आज आरमोरी शहरातील सर्वात मोठया या शिवजन्म उत्सवात शोभायात्रेत आयोजन समितीचे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष चंदू बेहेरे, शिवसेनेचे जिल्हा संघटक राजू अंबानी, न.प.चे बांधकाम सभापती सागर मने, भूषण सातव, शिवसेना तालुकाध्यक्ष महेंद्र शेंडे, विजय मुरवतकार, विलास दाने, गणेश तिजारे, शैलेश चीटमलवार, अक्षय चाचरकर, जयंत दहिकर, निशांत ठवकर, अक्षय धकाते, आकाश मडावी, मयूर बेहेरे, संकेत टिचकुले, कुणाल डोकरे तर प्रमुख उपस्थितीमध्ये किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरडीवार, माजी आमदार रामकृष्ण मडावी, माजी आमदार आनंदराव गेडाम, नगराध्यक्ष पवन नारनवरे, आरमोरी पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रशेखर मने, माजी जिल्हा परिषद सभापती श्रीरंग धक्काते, आरमोरी प.स.चे उपसभापती चंदू वडपल्लीवार,काँग्रेस तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, माजी सरपंच बुधाजी किरमे, प्रेमनाथ बेहरे,शंकर सातव, शिवसेनेचे बाळा बोरकर, देविदास काळबांधे,काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मनोज वनमाळी, पंकज खरवडे, काँग्रेसच्या जि. महासचिव रोशनी बैस,माजी जि. प.सभापती वेणूताई ढवगाये, मेघा मने, सारिका कांबळे, शालिक पत्रे, विजय सुपारे, मनोज मने, महेश सातव, गुलाब मने, योगेश देविकार यासहित गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.