आरमोरी नगरपरिषदेच्या घनकचरा कंत्राटदारास अटक बनावट दस्तावेज देऊन केली नगरपरिषदेची फसवणूक  आरोपी कंत्राटदारास पाच दिवसाची पोलीस कोठडी

आरमोरी- श्री साई अभियंता बेरोजगार सहकारी संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष तथा आरमोरी नगरपरिषदेच्या घनकचरा कंत्राटदाराने अवैध पद्ध्तीने कंत्राट मिळवून व बनावट दस्तावेज सादर करून आरमोरी नगरपरिषदेची फसवणूक केल्याने आरमोरी पोलिसांनी सदर कंत्राटदारास अटक केल्याची घटना दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी उघडकीस आली.

अटक करण्यात आलेल्या घनकचरा कंत्राटदाराचे नाव अभिजित सुभाष नामपल्लीवार वय ४४ वर्षे रा.ओंकार नगर,राघवेंद्र सोसायटी नागपूर असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरमोरी नगर परीषद सोबत १५ वे वित्त आयोग सन २०२२–२०२३ या वर्षा करीता घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत वर्गीकृत कचरा संकलन वाहतुक व त्यावरील प्रक्रिया करणे कामाची ‘ई’ निवीदा आमंत्रीत करण्यात आली होती. यातील आरोपी अभिजीत एस. नामपल्लीवार, अध्यक्ष श्री. साई अभियंता बेरोजगार सेवा सहकारी संस्था चंन्द्रपुर ता.जि. चंद्रपूर यांनी नगर परीषद आरमोरी या कार्यालयास, मजुरांचा बनावटी ई.पी.एफ. चलान तयार करून सादर केला आहे. नगर परीषद कार्यालयातुन दि. २१ एप्रिल २०२२ पासुन ३१ डिसेंबर २०२२ पर्यन्तचे देयके प्राप्त करून रू. १६,७३,४३५/- रू. मजुरांच्या ई.पी.एफ. चलानाच्या रककमेचा भरणा केलेला नाही. व बनावटी दस्ताऐवज सादर केला. तसेच अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३८,४१,२८०/- रू. चे बनावटी बॅक गॅरंटीचे दस्ताऐवज सादर केल्याने नगर परीषद कर्मचारी व अधिकाऱ्यासह संपुर्ण नगरपरीषद प्रशासनाची फसवणुक करून अवैध पध्दतीने कंत्राट मिळवून बनावट दस्ताऐवज सादर करून नमूद आरोपीने फसवणूक केली. अशा तक्रारी वरून पो.स्टे. आरमोरी अप.क्र. ९७/२०२३ कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ भा.द.वि. सदरचा गुन्हा नोंद करून यातील आरोपी नामे अभिजीत सुभाष नामपल्लीवार यास अटक केली.आज दि.११ एप्रिल रोजी आरमोरी पोलिसांनी सदर आरोपीस आरमोरी येथील प्रथम सत्र न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यास दिनांक १५ एप्रिल २०२३ पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे

आरोपी कंत्रातटदाराकडे जिल्ह्यातच नव्हेतर बाहेर जिल्ह्यातही घनकचऱ्याचे अनेक कंत्राट असून, त्यातही असे खोटे व बनावटी दस्तावेज जोडले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे .याबाबत गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखालीआरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप मांडलिक अधिक तपास करीत आहेत.

काय म्हणतात पाणी पुरवठा अभियंता-नितीन गोरखेडे

दिनांक ३एप्रिल रोजी कंत्राटदार अभिजित नामपल्लीवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी मला तत्कालीन मुख्यधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी प्राधिकृत केल्याने मी दिनांक०७एप्रिल २०२३ रोजी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. सन 2022 -2023 या वर्षा करीता इ निविदा आमंत्रित करण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेत ०६ कंत्राटदारांनी निविदा सादर केली होती. त्यापैकी कागद पत्र तपासणी अंती पात्र ४निविदा धारकापैकी साई अभियंता बेरोजगार सेवा सहकारी संस्था चंद्रपूर यांनी सर्वात कमी म्हणजे अंदाज पत्रकीय दरापेक्षा २२.७५% कमी दराची निविदा सादर केल्याने नगर परिषद च्या ठरावा नुसार निविदा मंजूर करण्यात आली . जानेवारी २०२३ चे देयक सादर करते वेळी सदर कंत्राटदाराने सादर केलेली इ .पी. एफ. चालाण शंका वाटल्याने त्या चालानाची पळताळणी केली असता एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत चालानाची भरणा न केल्याचे आढळून आले. तसेच इ .पी. एफ. चालनाची दस्तावेज बनावटी दस्तावेज सादर केल्याने कंत्राटदाराने सादर केलेली बँक ग्यारंटी बनावटी असल्याची शक्यता बळविल्याने मी स्वतः बँक ग्यारंटी पळताळणी केली असता, कंत्राटदारास सदर बँकेने सदर कंत्राटदारास बँक ग्यारंटी दिली नसल्या बाबत बँकेने अहवाल दिला आहे. याबाबत आपण सदर कंत्राटदारास दोनदा खुलासा मागितले असता, तसेच नोटीस दिले असता कुठलाही खुलासा सादर केला नसल्याने व कंत्राटदाराने बनावटी दस्तावेज सादर केल्याने मुख्याधिकारी यांचे आदेशानुसार नगरपरिषदेची फसवणूक झाल्याबद्दल पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.