बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटली कि एक वेगळाच जोश आणि उत्साह संचारतो

आरमोरी.

..गेल्या अनेक दिवसापासून भिमजयंती उत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यानी १४ एप्रिलचा जयंती दिवस हटके साजरा केला. गेल्या चार दिवसांपासून आरमोरी व तालुक्यातील अनेक गावांत जयंती उत्सवानिमित्ताने विवीध समाजप्रबोधनाचे कार्यक्रम सूरु आहेत.दिनांक १३एप्रिल च्या रात्रौ बारा वाजताच महात्मा फुले चौक व ईतर ठिकाणीं रात्रीचं केक कापून व फटाके फोडून अनेकांनी हा उत्सवाचा जल्लोष केला.
आरमोरी ही जिल्ह्यांतील सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक, राजकिय वारसा लाभलेली भूमी आहे. याच आरमोरी शहरात भिमजयंती उत्सव नेहमीच धूमधडाक्यात साजरा केला जातो. यावेळेचा उत्सवही नेहमीपेक्षा अतिशय जल्लोषात साजरा झाला. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयती दिनी काढण्यात आलेल्या अभिवादन रॅलीत पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हजारो आंबेडकरी अनुयायी रॅलीत सहभागी होऊन एकवटली. महीला, युवक, युवतीनी निळे फेटे बांधून बाबासाहेबांच्या डिझेवर वाजणाऱ्या स्पूर्तिदायी गीतांवर हजारों युवक युवती, महिलां व बच्चे कंपनीचे पाय थिरकले, सर्व जाती धर्माचे झेंडे रॅलीत झलकल्याने बाबासाहेबांची सामजिक समता, व एकतेच्या भूमिकेचे प्रदर्शन रॅलीत प्रकर्षाने पाहायला मिळाले, जवळपास एक किमी. पर्यंत लांब ही रॅली होती. या रॅलीत अनेक जाती धर्माचे लोक सहभागी झाली होते.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वा जयंती उत्सव आरमोरीत मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सकाळीं आरमोरी येथील तथागत बुद्ध विहारातून अभिवादन रॅली काढण्यात आली.
सदर रॅली आरमोरी शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. रॅलीदरम्यान स्थानीक महात्मा ज्योतिबा फुले चौकात महात्मा फुले यांच्या पुतळ्याला तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पटेल चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आले.
सदर रॅली आरमोरी शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी शरबत, व थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. सदर रॅलीने आरमोरी शहर दुमदुमुन गेले.
रॅलीचा चार तासानंतर तथागत बुद्ध विहारात समारोप करण्यात आला. विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली . तसेच रॅलीत सहभागी झालेल्या बौद्ध बांधवासाठी आ. कृष्णा गजबे यांच्याकडून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी आरमोरीचे पोलिस निरीक्षक संजय मंडलिक, डॉ. आंबेडकर स्मारक मंडळाचे अध्यक्ष यशवंत जांभूळकर सह मंडळाचे पदाधिकारी यांचेसह आरमोरी व तालुक्यातील अनेक भागातील आंबेडकरी अनुयायी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. संचालन व आभाप्रदर्शन स्मारक समितीचे सचिव किशोर सहारे यानी केलें.