आनंद बौद्ध विहार तथा आनंद मित्र मंडळ आनंदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने संगीतमय कार्यक्रमातून बाबासाहेबाना अभिवादन

आरमोरी दि. 15 एप्रिल 2023
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती आनंद बौद्ध विहार तथा आनंद मित्र मंडळ आनंदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरचे सुप्रसिद्ध गायक वीरेंद्र बोरडे यांचा सूर नवे युगंधराचे बुद्ध-भीम गीताच्या कार्यक्रमातून बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले , छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून वंदन केल्यानंतर मंचावर पाहुण्यांचे आगमन झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. भाग्यवानजी खोब्रागडे, शिक्षण महर्षी आरमोरी, उदघाटक मा. जयकुमार मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते, मा. अमोलभाऊ मारकवार माजी जि. प. सदस्य, मा. विजयकुमार ठवरे, प्रा.शशिकांत गेडाम, मा. विलास पारधी, मा. मनोज टेम्भूर्णे मा. मिलिंद खोब्रागडे न.प. आरमोरी, मा. संदीप ठाकूर, श्री. मनोज मोटघरे उपस्थित होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्या क्षणाची आठवण, भारतीय संविधान लिहिताना घडलेले प्रसंगातून आपले अध्यक्षीय मनोगत मा. भाग्यवानजी खोब्रागडे साहेबानी व्यक्त केले. तसेच उदघाटक मा. जयकुमार मेश्राम यांनी भारतीय संविधान आपल्या समाजासाठी कसे महत्वाचे आहे, नवीन शिक्षण प्रणाली, आर्थिक साक्षरताबाबत महत्व पटवून दिले. यावेळे मा. अमोलभाऊ मारकवार, मा. विजयकुमार ठवरे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रवी काशिनाथ गणवीर यांनी केले तसेच कार्य्रमाचे आभार प्रदर्शन श्री. मोरेश्वर गोपाल तागडे यांनी केले.
त्यानंतर लगेच वीरेंद्र बोरडे नागपूर यांचा बुद्ध भीमगीतांचा संगीतमय कार्यक्रमाला सुरवात झाली या कार्यक्रमात वार्डातील तसेच आरमोरी येथील जनतेनी कार्यक्रमाचा शेवटपर्यंत आस्वाद घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष , सिद्धार्थ खोब्रागडे, उपाध्यक्ष गौतम मेश्राम, सचिव छगन खोब्रागडे, कोषाध्यक्ष सुमित खोब्रागडे तसेच प्रा. प्रशांत गणवीर, श्री. हेमंत खोब्रागडे , यश खोब्रागडे, संदीप गणवीर, हर्षल तागडे, विलास गजभिये, उमेश खोब्रागडे व समस्त आनंद बुद्ध विहार महिला मंडळ व मित्र मंडळ उपस्थित राहून सहकार्य केले