आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर पोरेड्डीवार गटाचे १० उमेदवार अविरोध

 

 

 

गडचिरोली जिल्ह्यात अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणाच्या सर्वांत मोठ्या आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची तालुका समाविष्ठ असलेल्या, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत एकूण १८ उमेदवारापैकी पोरेड्डीवार गटाचे १० उमेदवार अविरोध निवडून आले आहेत.

 

आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. या निवडणूकीत सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघ गटातून पोरेड्डीवार गटाचे खिळसागर नाकाडे, तर सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती मतदारसंघ गटातून रत्नाकर शामराव धाईत है अविरोध निवडूण आले आहेत.

 

ग्रामपंचायत मतदार संघ गटातून सुरेश शामराव काटेंगे हे अविरोध निवडूण आले आहेत. तर हमाल मापारी मतदार संघ गटातुन धनंजय कोंडू ठाकरे हे अविरोध झाले आहेत. व्यापारी व अडते मतदार संघ गटातून गुरुमुखदास लिलाराम नागदेवे व मुनेश चिंतामनः मेश्राम हे अविरोध झाले आहेत.

 

सेवा सहकारी सर्वसाधारण मतदार संघात पोरेड्डीवार गटाचे सात उमेदवार रिंगणात

 

आहेत, तर विरोधी गटाचे चार उमेदवार रिंगणात असल्यामुळे तिन उमेदवार निवडून येणार

 

आहेत. सेवा सहकारी महिला मतदार संघात पोरेड्डीवार गटाचे दोन महीला उमेदवार उभे

 

आहेत तर विरोधी गटाचे १ उमेदवार उभे असल्यामुळे पोरेड्डीवार गटाचे एक महीला उमेदवार

 

निवडूण येणार आहेत.

 

गेल्या ५५ वर्षांपासून आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समिती ही पोरेड्डीवार गटाच्या ताब्यात आहे. यापुर्वीच्या निवडणूकीत विरोधकांनी संपुर्ण ताकदीने निवडणूक लढविल होती, परंतु एकाही निवडणूकीत विरोधकाचा टिकाव लागला नाही. हे विशेष. आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या मार्गदर्शनात सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वात लढली जात आहे.