*प्रा.नानाजी रामटेके यांचा सत्कार*

आरमोरी येथील जेतवन बौद्ध समाज विकास मंडळ, यांच्या वतीने बुध्द पूर्णिमा निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात प्रा.नानाजी रामटेके यांनी सामाजिक , शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र यांचेकडून राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार तसेच विश्व समता कला मंच, लोवले तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांचेकडून राज्यस्तरीय विश्व समता आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मनोज काळबांधे पोलिस निरीक्षक पी. टी.सी.किटाळी यांच्या हस्ते त्यांचा शाल ,श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.नानाजी रामटेके हे कर्मवीर कला कनिष्ठ महाविद्यालय , वासाळा ( ठाणेगाव ) येथे इंग्रजी भाषा विषयाचे प्राध्यापक आहेत.
यावेळी प्राचार्य मदन मेश्राम,सचिव प्रेरणा शिक्षण संस्था वडधा , प्राचार्य सुरेश चौधरी , ऍड.जगदीश मेश्राम ,अशोक वाकडे माजी सभापती, बंडुजी बारसागडे,प्राचार्य अमरदिप मेश्राम ,देवेंद्र रामटेके ,राजू धात्रक, रवि गणवीर , अमोल मारकवार माजी जि.प.सदस्य , प्रा.पूनम दुर्योधन, डॉ.संगिता रेवस्कर, वेणूताई ढवगाये , विद्या घुटके आदी उपस्थित होते.