आरमोरी-आरमोरी तालुक्यातील पेठतुकुम ( इंजेवारी) येथील कु.भारत रेवनाथ पेंदाम हा १९ वर्षीय विद्यार्थी मागील १० महिन्यापासून अल्पशा आजाराने ग्रस्त असून अनेक दवाखान्याच्या वाऱ्या करून सुद्धा त्याची प्रकृतीत कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. भारत चे आई-वडील हे मोलमजुरी करून आपल्या मुलाला वाचविण्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करीत असून, आपल्या लाडक्या मुलाकडे विशेष लक्ष देत असले तरीही मात्र ते पूर्णपणे हतबल झाले आहे.घरी अठरा विश्व दारिद्र असून आपल्या मुलाला बरे करण्याची धडपड त्यांना स्वस्त बसू देत नाही आहे. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांना पुढील उपचार करणे अत्यंत जड जात आहे.
दिनांक १८ जून २०२३ च्या दैनिक देशोन्नती अंकात “पोट बिघडले आणि युवा कुस्तीपटू पडला अंथरुणावर”या मथळ्याखाली बातमी प्रकाशित होताच प्रकाशित होताच आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा.डाँ.के.टी. किरणापुरे व आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ईश्वर पासेवार यांनी प्रत्यक्ष भारतच्या घरी जाऊन त्याची व त्याच्या आई-वडिलांची भेट घेऊन आरोग्याविषयी चर्चा केली. व डाँ.के.टी. किरणापुरे व ईश्वर पासेवार अल्पशी सानुग्रह निधी म्हणून भारतच्या पुढील उपचारासाठी अल्पशी मदत केली. यावेळी किरणापुरे म्हणाले की, भारत पेंदाम हा महात्मा फुले विद्यालय देऊळगाव. ता. आरमोरी . जि.गडचिरोली येथे शिक्षण घेत असताना त्याने कुस्ती या खेळामध्ये सहभाग घेऊन जिल्हा स्तरावर विजय मिळवून राज्यस्तरावर निवड झाली होती.असा हा आरमोरी तालुक्यातील गुणवंत कुस्तीपटू आज मात्र कमी वयातच अंथरुणावर पोटाच्या आजाराने खितपत पडला आहे. भारत वर उपचार करण्याची कुटुंबाची परिस्थिती राहिली नाही त्यामुळे मुलाला जगवावे तरी कसे या चिंतेने या गरीब कुटुंबाचे जिने हराम झालेले आहे पेंदाम कुटुंबाचा भारत हा एकुलता एक मुलगा, त्याचे वडील कुटुंबाचा प्रपंच चालवीत आहेत डॉक्टरांनी सांगितलेला खर्च त्यांच्या आवाक्या बाहेरचा आहे. समाजाची आर्थिक पाठबळ मिळाल्यास भारत वाचेल. तरुण वयातच नीयतीचे कठोर आघात शोषण्याची वेळ भारतवर आली आहे त्याला गरज आहे ती समाजाने मदतीचा हात देण्याची, हीच मदत त्याला पुन्हा एकदा लढण्याचे बळ जगण्याची उभारी देऊ शकते.दुर्धर आजाराने ग्रासलेल्या भारत पेंदाम या युवकाच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांनी,तसेच लोकप्रतिनिधी,स्वयंसेवी संस्थांनी सढळ हातांनी मदत करावी असे आवाहन किरणापुरे व पासेवार यांनी केले. .भारत पेंदाम याला आर्थिक मदत करताना प्रा.डाँ.के.टी. किरणापुरे यांचे सोबत कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरी चे सभापती ईश्वर पासेवार, इंजेवारी ग्रामपंचायतचे उपसरपंच मंगेश पासेवार, पत्रकार रुपेश गजपुरे,.ईशांत ठाकरे,. प्रकाश दाणे ,प्रीतम किरणापुरे, भारतचे वडील रेवनाथ पेंदाम, आदी उपस्थित होते.