आरमोरी उपजिल्हा रुग्णालयातील रक्त पेटीचे प्रलंबित नुतनीकरण तात्काळ करा.अन्यथा अन्न व औषध प्रशासन गडचिरोली कार्यालयाला घेराव घालणार. 

 

 

तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात नागरीकाचा ईशारा 

 

आरमोरी – तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आरमोरी येथे उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ होवू नये, यासाठी रुग्णालयात रक्तपेढी सुद्धा सुरु करण्यात आली. मात्र मागील पाच साहा महिन्यापासून रक्तपेढीची मुदत संपल्याने ती बंद आहे. त्यामुळे उप जिल्हा रुग्णालयातील भरती असलेल्या डिलिवरी व अन्य रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त आणण्यासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालय गाढुण पाण्या पावसाच्या धावपळीत सहन करुन वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना काहीही होऊ शकतो यामुळे रक्त पेटी सुरू करण्यात यावे यामागणी साठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात शिष्टमंडळाने धडक दिली व वैद्यकीय अधीक्षक डॉ राजकुमार कोरेटी याची भेट देऊन रक्त पेटी संदर्भात चर्चा करण्यात आली यात वैद्यकीय अधीक्षक डॉ राजकुमार कोरेटी यांनी सांगितले की गेल्या फरवरी महीण्यात आम्ही गडचिरोली येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे रक्त पेटी नुतनीकरण करण्यासंदर्भात सर्व कागदपत्रे व चालण भरली आहे परंतु अजुन पर्यंत नुतनीकरणा समधी प्रस्ताव प्रलंबित आहे. सांगितले यावरुन अन्न व औषध प्रशासन विभागाचे वेळकाडु धोरणामुळे नागरिक रक्तासाठी त्रास असल्याने आरमोरी उपजिल्हा रुग्णालयातील रक्त पेटीचे प्रलंबित नुतनीकरण तात्काळ करण्यात यावे अन्यथा अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला घेराव घालणार असा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात नागरिकांनी ईशारा दिला आहे.

यावेळी डॉ मुखरु चिखराम निलकंठ सेलोकर मनोज बोरकर आदिकराव मेत्राम प्रदिप सडमाके मयुर मेत्राम रुपेश झजालकर उपस्थित होते.