आमदार विजय वडेट्टीवारांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड तालुका काँग्रेसच्या वतिने फटाके फोडून आनंदोत्सव

 

देसाईगंज-
अतिदुर्गम, अतिसंवेदनशील म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याशी नाळ जुळलेली असलेल्या विद्यमान ब्रम्हपुरी विधानसभा क्षेञाचे आमदार विजय वडेट्टीवारांची विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात येताच देसाईगंज तालुका काँग्रेसच्या वतीने रासेकर ट्रक्टर्स समोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी सभापती परसराम टिकले,जेष्ठ नेते राजु रासेकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सावसाकडे,माजी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज चहांदे,ओबीसी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव मनोज ढोरे,माजी नगरसेवक हरीश मोटवानी,विक्की रामानी आदी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
वडेट्टीवार मुळचे गडचिरोली जिल्ह्याचे असल्याने त्यांना गडचिरोली जिल्ह्याची इत्यंभूत माहिती आहे.राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी अनेक स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देऊन उभे केले असल्याने जिल्ह्याच्या प्रत्येक गावात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.जिल्ह्यातिल शेतकरी, कामगार, तरुणवर्ग, महिला तसेच सामान्य जनतेच्या समस्यांची त्यांना जाण असल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याच्या आशा आता वडेट्टीवारांमुळे पल्लवित झाल्या आहेत.
वर्तमान स्थितीत देशभरात काँग्रेसची मोट बांधत असताना सकारात्मक प्रतिसाद मिळु लागल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात माञ सक्षम नेतृत्वाअभावी गटातटाच्या राजकारणाला उधाण आले आहे.गटातटाच्या राजकारणामुळे विखुरल्या गेल्या कट्टर काँग्रेसींना सोबत जोडुन जिल्ह्यात काँग्रेसची वज्रमूठ अधिक सक्षम करण्यात वडेट्टीवार सक्षम असल्याचा येथील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे. त्याचाच परिपाक वडेट्टीवारांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड होताच देसाईगंज तालुक्याच्या गावागावात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.