आरमोरी….अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य डॉ.राजकुमार शेंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत आनंद महाथेरो यांनी केली आहे.
डॉ. राजकुमार शेंडे हे गडचिरोली जिल्ह्यातील बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात.तसेच विदर्भात अनेक ठिकाणी झालेल्या बौद्ध धम्म परिषदेमध्ये त्यांनी धम्मावर मार्गदर्शन सुद्धा केले आहेतः . बुद्ध धम्मावरचे त्यांनी लिहिलेले अनेक लेख आजवर प्रकाशित झालेले आहेत.नुकतेच बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी विहाराला भेट दिली असता तिथे त्यांना बौद्ध भिक्षूंना मार्गदर्शन करण्याची संधी सुद्धा मिळाली होती. त्यावेळी त्यांना बुद्धगया विहार कमिटीवर घेण्याचे आश्वासन राष्ट्रीय अध्यक्ष भदंत आनंद महाथेरो यानी दिले होते .
बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने डॉ. राजकुमार शेंडे यांची गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यात अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष, महासचिव, कोषाध्यक्ष, व प्रचार मंत्री असे दहा ते अकरा सदस्य नियुक्ती करण्याचे अधिकार सुद्धा राजकुमार शेंडे यांना दिले आहे
अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.